मुंबई 20 एप्रिल: लॉकडाऊनमुळे सगळेच व्यवहार बंद आहेत. त्यामुळे कायम काट्याच्या घड्याळ्यावर काम करणारे कलाकार सध्या घरीच आहेत. आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने #AskSRK या हॅशगॅटचा वापर करत त्यांना प्रश्न विचारायला सांगितले. मग काय, चाहत्यांनी प्रश्नांचा पाऊस पाडला आणि शाहरुखनेही त्यांच्या प्रश्नांना बिनधास्त उत्तरं दिली. एक चाहत्याने विचारलं की लॉकडाऊनमुळे घरी आहात तर तुम्ही काय करता? या प्रश्नावर शाहरुखने मजेदार उत्तर दिलं. त्याने लिहिलंय की, घरी राहून लोकसंख्या वाढविण्याचं काम करण्यापेक्षा मी माझ्या तीन मुलांमध्ये रमतो आहे. माझी तीनही मुलं वेगवेगळ्या आकार आणि साईजची आहेत. त्यांच्याशी खेळतो आणि राहिलेला वेळ हा त्यांची खेळणी स्वच्छ करण्यात जातो. शाहरुख खानला तीन मुलं आहेत. सगळ्यात मोठा मुलगा आर्यन, मुलगी सुहाना आणि सगळ्यात लहान मुलाचं नाव अबराम आहे.
एका मुलीने तर त्याला आपलं स्वप्न सांगितलं. गौरी खान माझ्या स्वप्नात आली होती आणि तिने तुझ्याविषयी मला सांगितलं. I Love Sir गौरीला माझ्याकडून हाय सांगा असंही ती म्हणाली. त्यावर गौरी आज रात्री माझ्या स्वप्नात आली तर मी तिला हाय सांगेल असं उत्तर शाहरुखने दिलं.
लोक तुला एवढं बरं वाईट बोलतात, तरीही तु एवढ्या शांतपणे कशी उत्तरं देतो असं विचारल्यावर शाहरुखने दिलेलं उत्तरही मजेदार आहे, तो म्हणाला, ‘बापू जी ने सिखाया था.. बुरा मत देखो, न सुनो, न कहो. उसी का पालन करता हूं आज तक.’
अशी अनेक बिनधास्त आणि मजेदार उत्तर देत शाहरुखने आपल्या चाहत्यांना आज खूष केलं. अशी अनेक बिनधास्त उत्तरं त्याने दिली आहेत.