Bollywood huge age gap between lead couple: पृथ्वीराज चौहान या नव्या येऊ घातलेल्या फिल्ममुळे बॉलिवूडमध्ये आजही वयामध्ये मोठं अंतर असलेल्या जोड्या ऑन स्क्रीनवर चालून जातात हे समोर आलंय. Age gap च्या याच मुद्द्यामुळे चर्चेत आलेले चित्रपट आणि त्यातले ऑन स्क्रीन कपल तुम्हाला माहित आहेत का?
पृथ्वीराज चौहान या चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्या वयात तब्ब्ल 30 वर्षांचं अंतर आहे. अक्षयचं वय 54 असून मानुषी अवघ्या 25 वर्षांची आहे.
ओम शांती ओम चित्रपटाच्या वेळी शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यामध्ये 20 वर्षांचं अंतर होतं. दीपिका 21 वर्षांची तर शाहरूख 41 वर्षांचा होता.
ऋतिक रोशन आणि पूजा हेगडे यांच्यामध्ये मोहेंजोदारो चित्रपटाच्या वेळी जवळपास 15 वर्षांचं अंतर होतं.
रोबोट या चित्रपटाच्या वेळी थलैवा रजनीकांत यांचं वय 59 होतं तर ऐश्वर्या राय-बच्चन 36 वर्षांची होती.
संजू बाबाचा गाजलेला चित्रपट मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये तो स्वतः 44 वर्षांचा होता तर ग्रेसी सिंग 23 वर्षांची होती.
गँग्स ऑफ वासेपूर 2 या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकी आणि हुमा कुरेशी यांच्यात बरीच age gap दिसून आली. हुमा 25 वर्षांची तर नवाझुद्दीन 37 वर्षांचा होता.