JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रणवीर सिंगच्या या अभिनेत्रीने बिकिनीवर लिहिलं 'हरे राम', मग झालं असं काही...

रणवीर सिंगच्या या अभिनेत्रीने बिकिनीवर लिहिलं 'हरे राम', मग झालं असं काही...

तिच्या या हॉट लुकिंग टॉप वर ‘हरे राम हरे कृष्णा’ असं लिहिलं होतं. त्यामुळं लोक चिडले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई 14 नोव्हेंबर : ‘**बेफिक्रे’मध्ये रणवीर सिंगसोबत अभिनेत्री वाणी (Vaani Kapoor)  कपूरची केमेस्ट्री चांगलीच जमली होती. त्यानंतर ती ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि  टाइगर श्रॉफ (Tiger Shroff) सोबत ‘वॉर’ (WAR)मध्ये झळकली होती. सध्या तिची चर्चा होतेय ती वेगळ्याच एका कारणामुळे. वाणी कपूरने एक खास बिकिनी टॉप घालून तो हॉट फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर असं काही झाली की या बोल्ड अभिनेत्रीलाच बोल्ड व्हावं लागलं.त्याचं असं झालं की वाणी कपूरने जो खास बिकिनी टॉप घातला होता त्यावर ‘राम’ आणि ‘कृष्‍ण’ अशी नावं लिहिली होती. तिच्या या हॉट लुकिंग टॉप वर ‘हरे राम हरे कृष्णा’ असं लिहिलं होतं. त्यामुळे लोक वाणीवर चांगलेच चिडले.

अशा टॉपवर देवांची नावं लिहिणं कितपत योग्य आहे असा सवाल लोकांनी तिला विचारलाय. त्यावरून सोशल मीडियावर तिला जाम ट्रोल केलं गेलंय.तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती सुंदर दिसत असली तरी तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. नेटकऱ्यांचा राग वाढल्याने वाणीही बचावात्मक मुद्रेत आली. आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लोकांनी केला. तर काही जणांनी वाणीच्या चित्रपटांवर बहिष्कारही घालण्याची मागणी केली. नेटकरी सातत्याने ट्रोल करत असल्याने शेवटी वाणीला आपले हे फोटो सोशल मीडियावरून काढावे लागले.

संबंधित बातम्या

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या