JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Happy Birthday Richa Chadha: एकेकाळी मॅगझिनमध्ये होती इंटर्न, आता बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये सामिल

Happy Birthday Richa Chadha: एकेकाळी मॅगझिनमध्ये होती इंटर्न, आता बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये सामिल

Happy Birthday Richa Chadha: बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढाने (Richa Chadha) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत: च स्थान निर्माण केलं आहे. अनेक संघर्षानंतर, ऋचाने चिकाटीने आपल्या अभिनयातून आपली योग्यता सिद्ध केली आहे.

0111

'गँग्ज ऑफ वासेपुर'मधली 'नगमा' म्हणजे ऋचा चड्ढाचा आज वाढदिवस आहे. ऋचाचा जन्म 18 डिसेंबर 1986 ला अमृतसरमध्ये झाला. (फोटो: Richa Chadha Instagram)

जाहिरात
0211

बॉलिवूडमधल्या प्रतिभावान अभिनेत्रींच्या चर्चांमध्ये ऋचा चढ्ढाचं नाव सर्वांत आधी घेतलं जातं. (फोटो: Richa Chadha Instagram)

जाहिरात
0311

ऋचाने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत: च स्थान निर्माण केलं आहे. (फोटो: Richa Chadha Instagram)

जाहिरात
0411

2008 मध्ये रिलीज झालेल्या 'ओय लकी! लकी ओय!' चित्रपटातून ऋचाने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात अभय देओल प्रमुख भूमिकेत होता. (फोटो: Richa Chadha Instagram)

जाहिरात
0511

चित्रपटांत येण्याआधी ऋचा एका मेन्स फॅशन मॅग्झिनमध्ये इंटर्न म्हणून काम करत होती. एकदा ती अभय देओलची मुलाखत घ्यायला गेली होती, पण त्याने नकार दिला होता. नंतर ऋचाने अभयसोबतच पहिल्या चित्रपटात काम केलं. (फोटो: Richa Chadha Instagram)

जाहिरात
0611

अमृतसरमध्ये 1984 ला झालेल्या दंग्यांमुळे ऋचाचं कुटुंब दिल्लीत स्थायिक झालं. तेव्हा ती केवळ 2 वर्षांची होती. (फोटो: Richa Chadha Instagram)

जाहिरात
0711

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या 'गँग्ज ऑफ वासेपूर' चित्रपटातील ऋचाच्या 'नगमा' या भूमिकेचं विशेष कौतुक झालं आणि त्यामुळेच तिची ओळख निर्माण झाली आणि मोठं यश मिळालं. ही भूमिका प्रमुख भूमिकेसारखीच होती हे तिचं वैशिष्ट्य. मनोज वाजपेयी किंवा नवाझुद्दीन सिद्दिकीच्या अभिनयाचं जितकं कौतुक झालं, तितकंच ऋचाच्या अभिनयाचंही झालं होतं. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर बेस्ट अक्ट्रेस क्रिटिकचा पुरस्कारही मिळाला होता. (फोटो: Richa Chadha Instagram)

जाहिरात
0811

'फुकरे' आणि 'रामलीला' या चित्रपटांतीलही ऋचाच्या कामाचं कौतुक झालं. (फोटो: Richa Chadha Instagram)

जाहिरात
0911

गेल्या वर्षी 'सेक्शन 375' मध्ये ऋचाने भूमिका साकारली होती. (फोटो: Richa Chadha Instagram)

जाहिरात
1011

यावर्षी कंगना रनौतसोबत 'पंगा' या चित्रपटातून ऋचा प्रेक्षकांच्या भेटीला आली. लवकरच तिचा 'शकीला' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'शकीला'चा ट्रेलर रिलीज झाला असून या चित्रपटात ऋचा 90 आणि 2000 च्या दशकातील अडल्ट चित्रपटांतील अभिनेत्री 'शकीला'ची भूमिका साकारताना दिसतेय. (फोटो: Richa Chadha Instagram)

जाहिरात
1111

मिर्झापूरमधील कलाकार अली फजल आणि ऋचा रिलेशनशिपमध्ये आहेत. या वर्षी ते लग्नही करणार होते. परंतु कोरोनामुळे त्यांनी लग्न पुढे ढकललं आहे. (फोटो: Richa Chadha Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या