क्रिती बऱ्याच काळापासून एका सुंदर घराच्या शोधात होती आणि जेव्हा तिने अमिताभ बच्चन यांची ही मालमत्ता पाहिली तेव्हा तिला ते नजरेत पहिल्या पसंत पडलं होतं.
क्रिती सेनन अपार मेहनत करून यशाच्या पायऱ्या चढत आहे. ती एकापाठोपाठ एक अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. मर्सिडीज-बेंझ मेबॅक जीएलएस ही आलिशान कार घेतल्यानंतर आता क्रिती लवकरच नवीन घरात शिफ्ट होणार आहे. क्रिती सॅननने अंधेरीमध्ये अमिताभ बच्चन यांचं एक आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतलं आहे, ज्यात ती लवकरच दिवाळीचा सण धूमधडाक्यात साजरी करण्यासाठी शिफ्ट होणार आहे. (फोटो -@kritisanon/amitabhbachchan/Instagram)
बॉलिवूडमध्ये क्रिती सेनन एकापाठोपाठ एक चित्रपट देत आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या ती तिच्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यात आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. 'मिमी' मधील आपल्या अभिनयाची प्रशंसा मिळवल्यानंतर, क्रिती आता 'हम दो हमारे दो' च्या रिलीजची तयारी करत आहे.( फोटो -@kritisanon/Instagram)
क्रिती आता अमिताभ बच्चनची भाडेकरू बनली आहे.तिने अलीकडेच मुंबईतील अंधेरी भागात एक मालमत्ता भाड्याने घेतली आहे. पिंकविलाच्या अहवालानुसार, अंधेरीमध्ये असलेली ही मालमत्ता अमिताभ बच्चन यांची डुप्लेक्स आहे. (फोटो @kritisanon/Instagram)
क्रिती बऱ्याच काळापासून एका सुंदर घराच्या शोधात होती आणि जेव्हा तिने अमिताभ बच्चन यांची ही मालमत्ता पाहिली तेव्हा तिला ते नजरेत पसंत पडलं होतं. (फोटो -@kritisanon/Instagram)
सध्या क्रितीचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. ती लवकरच वरुण धवनसोबत 'भेडिया ' चित्रपटात दिसणार आहे. क्रितीचा हा कॉमेडी हॉरर चित्रपट आहे. तिने या वर्षाच्या सुरुवातीलाच चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. यासोबत ती 'आदिपुरुष'मध्ये साऊथचा सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहे. या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अक्षय कुमारसोबत 'बच्चन पांडे' आणि टायगर श्रॉफसोबत 'गणपत' मध्येही दिसणार आहे.(फोटो -@kritisanon/Instagram)
क्रिती लवकरच अमिताभ बच्चन यांच्या शो कौन बनेगा करोडपती 13 मध्ये दिसणार आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बिग बींनी बॉलरूम डान्स करताना क्रितीसोबत एक फोटो शेअर केला.(फोटो : @amitabhbachchan/Instagram)
अभिनेत्रीने गेल्या महिन्यातच मर्सिडीज-बेंझ मेबॅक जीएलएस 600 खरेदी केली आहे. या वाहनाची मालक होण्याबरोबरच तिने आपल्या नावावर एक विक्रम केला आहे. (फोटो -@kritisanon/Instagram)
मर्सिडीज-बेंझ मेबॅक जीएलएस 600 सारखे महागडे वाहन खरेदी करणारी ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री बनली आहे, ज्याची किंमत 2.43 कोटी रुपये आहे. ही कार 'जगातील लक्झरी एसयूव्ही' मध्ये देखील समाविष्ट आहे.(फोटो -@kritisanon/Instagram)