एकीकडे वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये रंगत येत आहे तर एक नावाजलेला क्रिकेटपटू त्याच्या बायकोसोबत ग्रीसमध्ये सुट्ट्यांचा आनंद उपभोगत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच आणि युवराज सिंग सध्या दोघं ग्रीसमध्ये सुट्ट्यांचा आनंद उपभोगत आहेत. त्यांचे ग्रीसमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हेजलने तिच्या इन्स्टाग्राम स्टेटसमध्ये त्यांच्या सुट्ट्यांचे अनेक फोटो शेअर केले. यात दोघांचीएकमेकांसोबतची बॉण्डिंग स्पष्ट दिसते. दोघांनी सँटोरिनीच्या रस्त्यांवरून ते समुद्र किनाऱ्यांची मजा घेतली.
हेजल आणि युवराजने अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये लग्न केलं. लग्नाआधी अनेक कार्यक्रमात दोघं एकत्र दिसायचे.
गेली अनेक वर्ष हेजल सिनेसृष्टीपासून दूर आहे. तिने मॅक्सिमम या सिनेमात शेवटचं आयटम साँग केलं होतं. याशिवाय धर्म संकट सिनेमात तिची छोटेखानी भूमिका होती.
एका मुलाखतीत याबद्दल बोलताना हेजल म्हणाली होती की, ‘मी हॅरी पॉटर अँड द फिलोसफर्स स्टोन, हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सीक्रेट्स आणि हॅरा पॉटर अँड द प्रिजनर्स ऑफ अजाकाबन या सिनेमांमध्ये हॉगवर्ट्समधील विद्यार्थीनीची भूमिका साकारली होती.’