‘हो मी मोदी सरांची मुलगी आहे. आणि यात खोटं असं काय आहे? भारतातील प्रत्येक मुलगीसाठी मोदी हे वडिलांप्रमाणे आहेत’, असं अवनी (Avani Modi) एका मुलाखतीत म्हणाली होती. तेव्हापासून Modi’s daughter असा सर्च इंटरनेटवर केला जात होता.
बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल अवनी मोदी कधी आपल्या हॉट अंदाजाने तर कधी आपल्या विधानांनी नेहमीच चर्चेत असते.
अवनी ही गुजरातच्या गांधीनगरची आहे. तिनं मधुर भांडारकरच्या 'कॅलेंडर गर्ल' या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं होतं. त्यात तिनं एका पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारली होती.
एका मुलाखती दरम्यान तिनं असं म्हटलं होतं. की तिला एका चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी एका विदेशी व्यक्तींनं विचारलं होतं. की तुम्ही पंतप्रधान मोदींच्या कोणी नातेवाईक तर नाही ना? यावर मी त्यांना म्हटलं होतं. हो मी मोदी सरांची मुलगी आहे. आणि यात खोटं असं काय आहे? फक्त गुजरातचं नव्हे तर भारतातील प्रत्येक मुलगीसाठी मोदी हे वडिलांप्रमाणे आहेत.
या उत्तरानंतर अवनी इंटरनेटवर मोदींची मुलगी या नावाने सर्च केली जाऊ लागली. तसेच अवनीला चित्रिकरणादरम्यान असे अनेक प्रश्न विचारले जातात.
त्यांनतर अवनी मोदी जाहिरातीतील एका चुकीमुळे प्रचंड चर्चेत आली होती. या अॅडमध्ये चुकून अवनीचा खाजगी मोबाईल नंबर छापण्यात आला होता. त्यानंतर तिला या नंबरवर अफाट फोन आणि मेसेज येत होते त्यामुळे ती त्रस्त झाली होती.
'कॅलेंडर गर्ल्स' या चित्रपटाची कथा ही पाच मुलींवर आधारित होती. ज्या मॉडेल होण्यासाठी विविध ठिकाणांहून मुंबईला येतात. आणि येथे एका बिकिनी हंट शो मध्ये सहभागी होतात.आणि येथे आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात कसा बदल येतो. त्यांना कोणकोणत्या गोष्टीना तोंड द्यावं लागतं. या गोष्टींना चित्रपटांत मांडण्यात आलं आहे.
अवनी चित्रपटांत आपल्या बोल्ड अंदाजामुळे सतत विवादात सुद्धा अडकत असते. आणि सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा होतं असते.