मुंबई, 28 जून : तुमच्या घरातील लाइट बिल (Light bill) पाहिल्यानंतर तुम्हाला मोठा धक्काच बसला असेल. मात्र अशी परिस्थिती फक्त तुमचीच नाही तर सेलिब्रिटींचीही झाली आहे. बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूलाही (Taapsee Pannu) असं भरमसाठ बिल आलं आहे. ते पाहून तिलाही शॉक बसला आहे. आपल्या सोशल मीडियावर तिनं आपल्या लाइट बिलचं स्क्रिनशॉट शेअर केलं आहे. एवढं बिल पाहिल्यानंतर जसा राग तुम्हाला आला, तसाच राग तापसीलाही आला. तापसी आपल्या रागाला आवरू शकली नाही. तिने तात्काळ या बिलाचा फोटो ट्विट केला आहे. तिने अदानी इलेक्ट्रिसिटीला टॅग केलं आहे.
“लॉकडाऊनला तीन महिने झालेत आणि मला आश्चर्य वाटतं की गेल्या एका वर्षात मी अशा कोणत्या नव्या उपकरणांचा वापक केला किंवा मी खरेदी केलीत की ज्यामुळे माझं लाइट बिल इतकं वाढलं आहे. तुम्ही कशा पद्धतीने बिल चार्ज केलं आहे?”, असा सवाल तापसीने केला आहे.
तापसीने पुढे दुसऱ्या अपार्टमेंटच्या लाइट बिलचा स्क्रिनशॉट टाकला आहे. ज्या अपार्टमेंटमध्ये कुणीच राहत नाही, त्याच वीज बिलही असंच आल्याचं तिनं सांगितलं. हे वाचा - बापरे! TikTok वर शेअर केला बेली डान्सचा व्हिडीओ; डान्सरला डांबलं तुरुंगात “आता हे त्या अपार्टमेंटचं बिल आहे, जिथं कुणीच राहत नाही. आठवड्यातून फक्त एकच वेळा तिथं फक्त साफसफाई केली जाते. आता हे अपार्टमेंट आम्हाला न सांगता दुसरं कुणी वापरत तर नाही ना याची चिंता मला लागली आहे. काय तुमच्यामुळेच आता हे आम्हाला समजलं असावं”, असं तापसी म्हणाली. संपादन - प्रिया लाड