विद्युतने नंदिता मेहतानीसोबत साखरपुडा केला आहे. सर्वांनाचं उत्सुकता लागली आहे नंदिताबद्दल जाणून घ्यायची.
'कमांडो' फेम अभिनेता विद्युत जामवालने नुकताच आपला साखरपुडा उरकला आहे. विशेष म्हणजे एकदम फिल्मी अंदाजात ताज महालसमोर विद्युतने साखरपुडा केला आहे.
विद्युतने डिझायनर असणाऱ्या नंदिता मेहतानीसोबत साखरपुडा केला आहे. सर्वांनाचं उत्सुकता लागली आहे नंदिताबद्दल जाणून घ्यायची.
विद्युतने अचानक जाहीर केलेल्या या बातमीने सर्वांनाचं सुखद धक्का बसला आहे. ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांनी आज नव्हे तर तीन दिवसांपूर्वी हा साखरपुडा उरकला आहे.
अभिनेत्री नेहा धुपियाने या दोघांना शुभेच्छा देत या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. या दोघांचे ताज समोरील व्हायरल झालेले फोटो पाहून सर्वच कोड्यात पडले होते.
नंदिता ही एक डिझायनर तर आहेच सोबतचं ती अभिनेत्री करिश्मा कपूरची सवतदेखील आहे. अर्थातचं ती करिश्मा कपूरचा पती संजय कपूरची पहिली पत्नी आहे.