JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Breaking! बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सर्पदंश; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ओढवलं संकट

Breaking! बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सर्पदंश; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ओढवलं संकट

मुंबई, 26 डिसेंबर- नुकताच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) सर्प दंश झाल्याचं समोर आलं आहे. सलमान खान आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये होता. मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. परंतु बिनविषारी सापाने चावा घेतल्याने सलमान खानची प्रकृती स्थिर आहे. सलमानला मध्यरात्री ३ वाजता कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं. आज सकाळी ९ वाजता त्याला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. सध्या अभिनेत्याची प्रकृती ठीक आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 डिसेंबर-  नुकताच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला  (Salman Khan)  सर्प दंश झाल्याचं समोर आलं आहे. सलमान खान आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये होता. मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. परंतु बिनविषारी सापाने चावा घेतल्याने सलमान खानची प्रकृती स्थिर आहे. सलमानला मध्यरात्री ३ वाजता कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं. आज सकाळी ९ वाजता त्याला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. सध्या अभिनेत्याची प्रकृती ठीक आहे.

सध्या सर्वत्र ख्रिसमसचं वातावरण आहे. अभिनेता सलमान खानसुद्धा आपल्या बिजी शेड्युलमधून वेळ काढून ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी गेला होता. सलमान खान आपल्या मित्रांसोबत येथे ख्रिसमस सेलिब्रेशन करत होता. त्यांनतर मध्यरात्री अचानक ही घटना घडली. सलमान खानचा उद्या वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने चाहते चिंतेत आहेत. सलमान खान सध्या रुग्णालयातून फार्महाउसवर परतला आहे. सध्या तो आपल्या तब्ब्येतीची काळजी घेत आहे. (हे वाचा: महाभारत’ मालिकेतील भीमवर आर्थिक संकट; असे काढताहेत हालाखीचे दिवस ) सलमान खानचा हा फार्महाउस पनवेलमध्ये आहे. याठिकाणी अतिशय घनदाट झाडी आहे. त्यामुळे येथे सतत जंगली प्राण्यांचा वावर असतो. सलमान खानचा भावोजी अर्थातच त्याची बहीण अर्पिता खानचा पती आयुष खानने सांगितलं होतं, की या फार्म हाऊसवर नेहमीच जंगली प्राणी पाहायला मिळतात. सलमान खान सतत आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत या फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसून येतो. लॉकडाऊनमध्ये तो अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत या फार्महाऊसवर राहिला होता. या ठिकाणी शेती करतानाचे आणि मजामस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या