बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे (Chunky Pandey) आणि पत्नी भावना पांडे (Bhavana Pandey) आज त्यांच्या लग्नाचा 23वा वाढदिवस साजरा करत आहेत.
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे आज लग्नाचा 23वा वाढदिवस साजरा करत आहेत. चंकी पांडे 17 जानेवारी 1998 रोजी भावना पांडे बरोबर विवाह बंधनात अडकला. यानिमित्ताने चंकी आणि त्याची पत्नी भावना पांडे यांची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत (फोटो सौजन्य: Instagram @chunkypanday/@bhavanapandey)
चंकी पांडे आणि भावना पांडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य: Instagram @chunkypanday)
चंकी आणि भावना पांडे यांना दोन मुली आहेत, त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडे आणि दुसरी रिसा पांडे. (फोटो सौजन्य: Instagram @chunkypanday)
चंकी पांडे एक प्रख्यात अभिनेता असून गेल्या काही वर्षांपासून तो केवळ विनोदी भूमिका साकारताना दिसत आहे . (फोटो सौजन्य: Instagram @bhavanapandey)
चंकीने 1987 मध्ये ‘आग ही आग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात अभिनेत्री नीलम कोठारीने स्क्रीन शेअर केली होती. (फोटो सौजन्य: Instagram @bhavanapandey)
चंकीला अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितच्या बहुचर्चित 'तेजाब' सिनेमा मधून चांगली ओळख मिळाली,. यात त्याने सपोर्टिंग ऍक्टरची भूमिका पार पडली होती. (फोटो सौजन्य: Instagram @bhavanapandey)
आपल्या 34 वर्षांच्या कारकीर्दीत चंकी पांडेने 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एवढंच नव्हे, तर त्याने अनेक हिट बांगलादेशी चित्रपटही दिले आहेत. (फोटो सौजन्य: Instagram @bhavanapandey)