जोश चित्रपटातील ऐश्वर्या रायचा हिरो सध्या काय करतोय? मागतोय निर्मात्यांकडे काम…पण…
अभिनेता चंद्रचूड सिंग जोश, माचीस यांसारख्या चित्रपटांमुळे एका रात्रीत यशाच्या शिखरावर पोहचला होता.
जोशमध्ये त्याने ऐश्वर्या रॉयसोबत काम केल होतं. तर 'क्या कहना' मध्ये प्रीती झिंटासोबत काम केल होतं.
चंद्रचूड गेल्यावर्षी 'आर्या' या वेबसिरीजमध्ये सुश्मिता सेनच्या पतीच्या भूमिकेत दिसला होता.
मात्र इतकी वर्षे तो कुठे गायब होता. हा प्रश्न सर्वांना पडतो. तर चंद्रचूडसोबत गोव्यामध्ये बोट रायडिंग करताना एक अपघात झाला होता.
त्यामुळे त्याच्या खांद्यांना जबर दुखापत झाली होती. यातून सावरण्यासाठी त्याला तब्बल 10 वर्षांचा कालावधी लागला. आणि यातच त्याचं करियर देखील नष्ट झालं. मात्र चंद्रचूडने गेल्या वर्षी आर्या मधून दमदार एन्ट्री केली आहे.