तुमच्या लाडक्या कलाकारांनी केलं होतं इतक्या कमी वयात लग्नं; PHOTO पाहून व्हाल दंग
बॉलिवूडमध्ये अशा अनेक कलाकारांच्या जोड्या आहेत ज्या चाहत्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. आणि त्यांची प्रेमप्रकरनंही खूप चर्चेत राहिली आहेत. मात्र तुमच्या या लाडक्या कलाकरांनी किती कमी वयात लग्नं केलं आहे हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. आज आपण अशाच काही जोड्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच शाहरुख आणि गौरिचं सूत जुळलं होतं. या दोघांनी वयाच्या 25 व्या वर्षी लग्नं केलं होतं. ही जोडी बॉलिवूड मधील यशस्वी जोड्यांपैकी एक समजली जाते. शाहरुख आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत.
अभिनेत्री सायरा बानो यांना जेष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांच्यासोबत प्रथमदर्शनीचं प्रेम झालं होतं. त्यांनंतर त्यांनी लग्नंसुद्धा केलं. लग्नात सायरा बानो केवळ 21 वर्षांच्या होत्या.
अभिनेता आयुष्यमान खुराना आणि पत्नी ताहीरा कश्यप हे आपल्या शालेय जीवनापासून एकमेकांवर प्रेम करत होते. त्यांनी जेव्हा लग्नं केलं तेव्हा ते 26 वर्षाचे होते. या जोडली 2 आपत्येसुद्धा आहेत.
अभिनेता ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांनी ही कमी वयात लग्नं केलं होतं. लग्नामध्ये नीतू या फक्त 21 वर्षांच्या होत्या.
अभिनेता सैफ अली खानने आपलीपहिली पत्नी अमृता सिंह सोबत विवाह केला होता. त्यावेळी तो अवघ्या 21 वर्षांचा होता. या जोडीला सारा खान आणि इब्राहीम अशी दोन मुलं आहेत. त्यानंतर सैफने अमृताशी घटस्फोट घेतला होता. 2012 मध्ये सैफने करीना कपूरसोबत दुसरा विवाह केला आहे.
अभिनेत्री काजोलनं जेव्हा अजय देवगणशी विवाह केला होता. त्यावेळी ती खूपच लहान वयाची होती. एकदा काजोलनं म्हटलं होतं की तिचे वडील कमी वयात लग्न करण्याच्या विरुद्ध होते. मात्र माझी आई तनुजा माझा सोबत यावेळी उभी होती. या जोडीला मुलगा युग आणि मुलगी न्यासा अशी दोन अपत्ये आहेत.
भारताचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेता राजेश खन्ना आणि पत्नी डिम्पल कपाडिया यांचही असचं काहीस आहे. डिम्पलनं जेव्हा राजेश खन्ना यांच्यासोबत लग्नं केलं होतं तेव्हा त्या केवळ 16 वर्षांच्या होत्या. या जोडीमध्ये तब्बल 15 वर्षांचं अंतर होतं. यांना ट्विंकल आणि रिंकी अशा दोन मुली आहेत.
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांनी जेव्हा आपल्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्याशी विवाह केला होता. तेव्हा ते केवळ 19 वर्षांचे होते. त्यानंतर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरा विवाह केला आहे.