JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / बॉलिवूडपासून दूर राहून या स्टार किड्सनी बनवली स्वतःची वेगळी ओळख! पाहा PHOTOS

बॉलिवूडपासून दूर राहून या स्टार किड्सनी बनवली स्वतःची वेगळी ओळख! पाहा PHOTOS

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्स आणि घराणेशाहीवरून बराच वाद सुरू आहे. पण काही स्टार किड्स असे सुद्धा आहेत. ज्यांनी बॉलिवूडपासून दूर स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे…

0106

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्स आणि घराणेशाहीवरून बराच वाद सुरू आहे. पण काही स्टार किड्स असे सुद्धा आहेत. ज्यांनी बॉलिवूडपासून दूर स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे...

जाहिरात
0206

दिवंगत बॉलिवूड सुपरस्टार ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनीला बॉलिवूडमध्ये कधीच रुची नव्हती. तिनं बॉलिवूडमध्ये न येता ज्वेलरी डिझाइनमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जाहिरात
0306

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदानं सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. श्वेता एक फॅशन डिझायनर आहे. याशिवाय तिचा स्वतःचा एक क्लोदिंग ब्रँड आहे.

जाहिरात
0406

राकेश रोशन यांची मुलगी सुनैना रोशन बॉलिवूडपासून नेहमीच दूर राहिली आहे. कॅमेरासमोर काम करण्यापेक्षा तिनं नेहमीच प्रॉडक्शन आणि फिल्म क्राफ्टचं काम पाहिलं.

जाहिरात
0506

बोनी कपूर यांची मोठी मुलगी आणि अर्जुन कपूरची बहीण अंशुला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मात्र ती सिनेमांपासून दूर आहे. तिनं गुगलसाठी काम केलं आहे. याशिवाय हृतिकच्या HRX ब्रँडसाठी तिनं ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम केलं होतं.

जाहिरात
0606

अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड यांची मुलगी मसाबा गुप्ता मागच्या काही काळापासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. मसाबानं बॉलिवूडमध्ये पदार्पण न करता फॅशन डिझायनर म्हणून करिअर केलं. आज ती इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या