Happy Birthday Vidya Balan: आज ही अभिनेत्री आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी.
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आपल्या अष्टपैलू व्यक्तीमत्वासाठी ओळखली जाते. तिने अनेक दमदार भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. तिला आपल्या चित्रपटांसाठी कधीही कोणत्या मोठ्या अभिनेत्याची गरज पडली नाही. तिने नेहमीच अभिनेत्री केंद्रित चित्रपट करण्यावर भर दिला आहे. आज ही अभिनेत्री आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी.
अभिनेत्री विद्या बालनने 'परिणीती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये ती सैफसोबत झळकली होती. तिच्या सहजसाध्या अभिनयाचं फारच कौतुक झालं होतं. परंतु हा प्रवास तिच्यासाठी तितका सोपा नव्हता.
विद्या बालन बॉलिवूडमध्ये आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. परंतु एक वेळ अशी होती, की त्यावेळी अभिनेत्रीला 'अपशकुनी' म्हटलं होतं.
विद्या बालन एका चित्रपटासाठी मुंबईला आली होती. त्यांनतर तिला समजलं की तो चित्रपटच बंद पडला आहे. हा चित्रपट कायमचा बंद झाला होता. त्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिला अपशकुनी म्हटल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
हा एक प्रसिद्ध दिग्दर्शक होता. त्याने अनेक प्रसिद्ध चित्रपट काढले होते. आणि त्यांनीच विद्याला अशा प्रकारची वागणूक दिली होती.
त्यांनतर विद्या बालनला एक दोन नव्हे तर तब्बल 12 चित्रपटांतुन काढून टाकण्यात आलं होत. हा काळ अभिनेत्रींसाठी फारच कठीण होता.
परंतु विद्या बालनने हार न मानता या सर्व परिस्थितीशी ताकतीने लढा दिला होता. आज तिने आपलं महत्व सिद्ध केलं आहे.