JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Birthday Special: लिप सर्जरीमुळे ट्रोल झाली होती अनुष्का शर्मा, नेटीझन्स म्हणाले...

Birthday Special: लिप सर्जरीमुळे ट्रोल झाली होती अनुष्का शर्मा, नेटीझन्स म्हणाले...

या लिप सर्जरीमुळे अनुष्काला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

0107

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहमीच तिचे सिनेमा आणि पती विराट कोहलीसोबत रोमँटिक फोटो शेअर केल्यानं चर्चेत असणाऱ्या अनुष्काला याआधी अनेक कारणांनी ट्रोल केलं गेलं आहे.

जाहिरात
0207

2010मध्ये आलेल्या 'बँड बाजा बारात' या सिनेमातून अनुष्कानं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमात ती रणवीर सिंहसोबत दिसली होती. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.

जाहिरात
0307

मात्र या सिनेमानंतर अनुष्का आणि रणवीरच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु झाल्या होत्या. मात्र या दोघांनीही आपल्या नात्याची जाहीर कबूली दिली नाही. काही काळातच त्यांच्यातील मतभेद वाढले आणि त्यांनी एकमेकांपासून दूर होणं पसंत केलं.

जाहिरात
0407

त्यानंतर अऩुष्का शर्मा चर्चेत आली ती तिनं केलेल्या लिप सर्जरीमुळे. 2014मध्ये आलेल्या 'पीके' सिनेमात अनुष्का हटके अंदाजात दिसली होती. त्यावेळी तिनं या सिनेमाच्या लुकसाठी लिप सर्जरी केली होती.

जाहिरात
0507

मात्र तिचा हा लुक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला नाही उलट या लिप सर्जरीमुळे अनुष्काला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. तिची तुलना नेटीझन्सनी बदकाशी केली होती.

जाहिरात
0607

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर अनुष्कानं पुन्हा एकदा लिप सर्जरी केल्याचं बोललं गेलं मात्र यावर स्वतः अनुष्कानं कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं.

जाहिरात
0707

अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नसताना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनुष्कानं आपल्या मेहनतीनं या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर 2017मध्ये ती भारतीय क्रिकेट संघांचा कर्णधार विराट कोहलीहीशी विवाह बंधनात अडकली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या