बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यामध्ये तब्बल १५ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. हे स्पर्धक तब्बल १०० दिवस या घरामध्ये राहणार आहेत. प्रत्येक आठवड्याला एक एक स्पर्धक घराबाहेर होणार आहे. त्यानुसार घरात नॉमिनेशन सुरु झालं आहे.
बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यामध्ये तब्बल १५ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. हे स्पर्धक तब्बल १०० दिवस या घरामध्ये राहणार आहेत. प्रत्येक आठवड्याला एक एक स्पर्धक घराबाहेर होणार आहे. त्यानुसार घरात नॉमिनेशन सुरु झालं आहे.
घरामध्ये प्रत्येक स्पर्धक आपली ओळख बनवण्यासाठी धडपडत आहे. प्रत्येक स्पर्धक एकमेकांना वरचढ ठरत आहे. त्यामुळे कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पहिल्या आठवड्यामध्ये एलिमिनेशन रद्द करण्यात आलं होतं.
त्यांनतर आता दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान घरामध्ये 'नाव मोठे लक्षण खोटे' असा नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. यामध्ये घरातील सदस्यांनी एकमेकांच्या घरातील अपुऱ्या योगदानावर, घरातील प्रत्येक गोष्टीतील उपस्थिती तसेच शोमध्ये केलं जाणारं मनोरंजन यावर खुलेपणाने भाष्य करत एकमेकांना नॉमिनेट केलं आहे.
यावेळी मीनलने स्नेहाला तिच्या खटकल्या गोष्टींबद्दल सांगत तिला नॉमिनेट केलं. मात्र यावेळी स्न्हेलने आपली बाजू मांडली आणि यामध्येच या दोघींच्यात मोठा वादविवाद पाहायला मिळाला.
तर दुसरीकडे जय दुधानेने सोनाली पाटीलला मला तुझी भीती वाटते तू एक खूप स्ट्रॉंग स्पर्धक आहेत. तू या घरामध्ये खूप फारच तगडी टक्कर देऊ शकतेस म्हणून मी तुला नॉमिनेट करत आहे', असं म्हणत सोनालीला घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलं आहे.
तर दुसरीकडे शिवलीला यांनी आपणही घरामध्ये आपलं १०० टक्के देणार असल्याचं सांगितलं. आणि सोबतच आपण घारतून बाहेर पडताना प्रत्येक सदस्यांच्या डोळ्यात पाणी येईल असं नातं मी जपेन असं त्या म्हणाल्या.
बिग बॉस मराठीमध्ये पहिलं नॉमिनेशन कोणाचं होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी शोमध्ये अनेक राडे पाहायला मिळत आहेत.