नुकताच शोचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्पर्धकांना ‘जोडी की बेडी’ हा टास्क देण्यात आला आहे. या टास्कच्या दुसऱ्याच दिवशी स्पर्धकांना ‘हल्ला बोल’ टास्क देण्यात आला आहे.दुप्पट आव्हाने आणि अडथळ्यांच्या साथीने हा आठवडा सुरु झाला आहे.
'बिग बॉस ३'ची मोठी धमाकेदार सुरुवात झाली आहे. मोठ्या वाद-विवादांमध्ये या सीजनचा पहिला आठवडा पार पडला आहे. पहिल्या आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी सर्व स्पर्धकांना चांगलंच झापलं आहे. तर दादूसच्या उत्तम खेळीवर त्यांचं कौतुकही केलं आहे. या सर्व धाकधुकीनंतर पहिला आठवडा पार पडला.
नुकताच शोचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्पर्धकांना 'जोडी की बेडी' हा टास्क देण्यात आला आहे. या टास्कच्या दुसऱ्याच दिवशी स्पर्धकांना 'हल्ला बोल' टास्क देण्यात आला आहे.दुप्पट आव्हाने आणि अडथळ्यांच्या साथीने हा आठवडा सुरु झाला आहे.
दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्पर्धकांना 'जोडी कि बेडी' टास्कनुसार एका बेडीत अडकवण्यात आलं आहे. बिग बॉसने या स्पर्धकांच्या जोड्या नेमून दिल्या आहेत. नेमून दिलेल्या जोड्यांसोबतच या स्पर्धकांना आठवडाभर राहायचं आहे.
नेमून दिलेल्या जोड्या बेडीमध्ये अडकून सतत एकेमकांसोबत असणार आहेत, या दरम्यान हे स्पर्धक कशा पद्धतीने आपलं प्लॅनिंग करणार? कस एकेमकांवर वरचढ ठरणार हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे.
दरम्यान दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धकांना 'हल्ला बोल' हा तुफानी टास्क देण्यात आला आहे. हा टास्क नेमका काय आहे, हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये कळणार आहे.
मात्र तत्पूर्वी या शोचा प्रोमो आपल्या समोर आला आहे. त्यानुसार एक जोडी बाईकवर बसलेली असणार आहे. तर दुसरे स्पर्धक त्यांना उठवण्याचा जबरदस्त पर्यटन करताना दिसून येत आहेत. या जोडीला उठवण्यासाठी त्यांच्या अंगावर वाटेल ते पदार्थ आणून टाकत आहेत.
यामध्ये कोणती जोडी बाईकवर टिकून राहणार आणि कोणत्या जोड्यांना इतर स्पर्धक बाईकवरून उठवण्यात यशस्वी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नुकताच मालिकेत नॉमिनेशन टास्कसुद्धा पार पडला आहे. या टास्कनुसार या आठवड्यामध्ये घरातून बाहेर जाण्यासाठी जय,मीनल,गायत्री, शिवलीला आणि अविष्कार हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये कोणाचं पाहिलं नॉमिनेशन होणार पाहणं महत्वाचं आहे.