JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Bigg Boss Marathi:पहिल्यांदाच बिग बॉसच्या घराची संपूर्ण झलक आली समोर; पाहा Inside Photo

Bigg Boss Marathi:पहिल्यांदाच बिग बॉसच्या घराची संपूर्ण झलक आली समोर; पाहा Inside Photo

महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेला ‘बिग बॉस मराठी’ हा बहुचर्चित रिएलिटी शो लवकरच आपल्या भेटीला येत आहे. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये कोण स्पर्धक असणार ते बिग बॉसचं नवं घर कसं आहे? या गोष्टी जाणून घेण्याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. नुकताच बिग बॉस सीजन ३ च्या घराचे इन्साईड फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत.

0112

महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेला 'बिग बॉस मराठी' हा बहुचर्चित रिएलिटी शो लवकरच आपल्या भेटीला येत आहे. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये कोण स्पर्धक असणार ते बिग बॉसचं नवं घर कसं आहे? या गोष्टी जाणून घेण्याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. नुकताच बिग बॉस सीजन ३ च्या घराचे इन्साईड फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत.

जाहिरात
0212

कोरोना महामारीमुळे 'बिग बॉस सीजन ३' लांबणीवर पडला होता. मात्र आत्ता हा शो आपल्या भेटीला आला आहे. त्यामुळे सर्वांच्या मनात एक हुरहूर सुरु आहे. बिग बॉसच घरसुद्धा यावेळी खूपच खास आहे. कारणही तसंच आहे.

जाहिरात
0312

'बिग बॉस' हा शो मराठीमध्ये पाहताना महाराष्ट्रीयन लोकांना आपला वाटावा. स्पर्धकांना आपलस वाटावं, यासाठी बिग बॉस सीजन ३ मध्ये घराला मराठमोळा टच देण्यात आला आहे. यावर्षीची थीमच मराठमोळी आहे. त्यामुळे लोकांना कुतूहल निर्माण झालं आहे.

जाहिरात
0412

'बिग बॉस सीजन ३' च्या घरचे हे फोटो पाहून चाहते सुखावले आहेत. चाहत्यांना घराची थीम प्रचंड आवडेल असंही मेकर्सचं म्हणणं आहे. सर्व लोकांना पाहताना हे आपलंस वाटेल.

जाहिरात
0512

या फोटोमध्ये एक जेल अर्थातच कैदखाना दिसत आहे. यावरून अंदाज येत आहे, की शिक्षा मिळालेल्या स्पर्धकाला यामध्ये राहावं लागेल.

जाहिरात
0612

स्पर्धकांना विश्रांतीसाठी झोपण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्थाही अत्यंत खास आहे. यामध्ये खूपच आकर्षक पिवळ्या रंगाचे बेड दिसून येत आहेत. शिवाय घराला काही पेंटिंगने सजवणायत आलं आहे.

जाहिरात
0712

या फोटोमध्येसुद्धा स्पर्धकांच्या झोपण्याची व्यवस्था दिसून येत आहे. याचाच अर्थ एक नव्हे तर दोन-दोन रंगाचे बेड बेड आपल्यला पाहायला मिळणार आहेत.

जाहिरात
0812

बिग बॉसच्या घरातील किचन रूमसुद्धा अत्यंत खास दिसून येत आहे. यावेळी किचनमध्ये सर्वत्र हिरवगार दिसून येत आहे. म्हणजेच सर्वत्र झाडाझुडपांची सजावट केली आहे.

जाहिरात
0912

या फोटोमध्ये आपल्याला स्टोअर रूम दिसून येत आहे. तीसुद्धा अत्यंत आकर्षक बनवली आहे. त्याच्या भिंतींवर छान अशी चित्रे रेखाटण्यात आली आहेत.

जाहिरात
1012

या फोटोमध्ये आपल्याला सीटिंग एरिया दिसत आहे. तोसुद्धा फारच सुंदर आहे. त्यामध्ये अगदी मराठमोळा टच आहे. मागे भिंतीवर काही नाटकांची नाव देखील लिहिण्यात आली आहेत.

जाहिरात
1112

या फोटोमध्ये आपल्याला एक काचबंद रूम दिसून येत आहे. आतमध्ये सुंदर असं बेड आणि झोपण्याची व्यवस्था आहे. हे नेमकं का असणार माहिती नाही. मात्र हे काहीतरी खास असणार हे नक्की.

जाहिरात
1212

बैठक व्यवस्थेमध्ये खूपच चॅन सजावट करण्यात आली आहे. अगदी पारंपरिक टच असणारे शो पीस आणि झुंबर वर लावण्यात आले आहेत. त्यामुळे पाहतानाही खूपच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या