JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात दणक्यात साजरा झाला स्नेहाचा वाढदिवस; मिळालं खास गिफ्ट

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात दणक्यात साजरा झाला स्नेहाचा वाढदिवस; मिळालं खास गिफ्ट

घरामध्ये बऱ्याच दिवसानंतर असं आनंदी वातावरण रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. स्पर्धक सध्या फुल्ल ऑन सेलिब्रेशन मूडमध्ये आहेत.

0106

'बिग बॉस मराठी'ला सुरुवात झाल्यापासून घरामध्ये सतत स्पर्धा आणि वादविवादाचं वातावरण आपण पाहिलं आहे. सतत घरातील स्पर्धक विविध टास्कमध्ये गुंतलेले दिसून येतात. दरम्यान त्यांच्यामध्ये अनेक राडे होताना पाहायला मिळतात.

जाहिरात
0206

मात्र आज बिग बॉस मराठीचा हा भाग अगदी खास असणार आहे. कारणही तसंच आहे. बिग बॉसच्या घरात आज एका स्पर्धकाचा वाढदिवस आहे. आणि ही स्पर्धक इतर कोणी नसून अभिनेत्री स्नेहा वाघ आहे.

जाहिरात
0306

आज घरामध्ये एक केक पाठवला जाणार आहे. आणि त्यासोबतचं घरातील सर्व स्पर्धक स्नेहासाठी मोठंमोठ्याने वाढदिवसाचं गाणं गात वाढदिवस साजरा करताना दिसून येणार आहेत.

जाहिरात
0406

हे स्पर्धक फक्त वाढदिवस साजरा करत असल्याचं दिसून येत नाहीयेत तर त्यांनी स्नेहाला एक सुंदर गिफ्टसुद्धा दिलं आहे. तृप्ती देसाई यांनी सर्वांच्यामार्फत एक सुंदर पिवळ्या रंगाचा टी सरत स्नेहाला गिफ्ट म्हणून दिला आहे.

जाहिरात
0506

सध्या बिग बॉसच्या घरात हे स्पर्धक मजामस्ती करत असल्याचं. तसेच केक खात असल्याचं दिसून येत आहेत. घरामध्ये बऱ्याच दिवसानंतर असं आनंदी वातावरण रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. स्पर्धक सध्या फुल्ल ऑन सेलिब्रेशन मूडमध्ये आहेत.

जाहिरात
0606

बिग बॉस मराठीच्या घरामधील सेलिब्रेशनचा हा एपिसोड आज प्रेक्षकांना टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी बिग बॉसचा नवा प्रोमो आणि घरातील फोटो प्रेक्षकांच्या समोर आले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या