JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / कोरोनाचा प्रकोप! रुपेरी पडद्यावरील नागिणही झाली COVID-19 ची शिकार

कोरोनाचा प्रकोप! रुपेरी पडद्यावरील नागिणही झाली COVID-19 ची शिकार

मोनालिसाला (Monalisa) कोविडची बाधा (Infected with Corona virus) झाल्याची माहिती अभिनेत्रीचा पती विक्रात सिंह राजपूत (Husband Vikrant singh Rajput) यांनी दिली असून तिच्यावर घरीच उपचार केले जात आहेत.

0105

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुपेरी पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा उर्फ अंतरा बिस्वास कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. रुपेरी पडद्यावरील नागिणच्या व्यक्तीरेखेमुळे ती चर्चेत आली होती. (Photo- Instagram/asalomonalisa)

जाहिरात
0205

मोनालिसाला कोविडची बाधा झाल्याची माहिती अभिनेत्रीचा पती विक्रात सिंह राजपूत यांनी दिली असून तिच्यावर घरीच उपचार केले जात आहेत. (Photo- Instagram/asalomonalisa)

जाहिरात
0305

मोनालिसा सध्या मुंबईत असून तिचा पति उत्तर प्रदेशात आहे. मोनालिसा घरीच राहून डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली उपचार घेत आहे. तसेच तिला कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. (Photo- Instagram/asalomonalisa)

जाहिरात
0405

पती विक्रांत सांगितलं की, कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर लोकं घाबरून जातात. पण सद्या मोनालिसाची प्रकृती ठिक आहे. (Photo- Instagram/asalomonalisa)

जाहिरात
0505

मोनालिसाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 'नमक इश्क का' च्या निर्मात्यांनी शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता संपूर्ण टीमची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यानंतरच मालिकेचं शूटिंग पुन्हा एकदा सुरू होणार आहे. (Photo- Instagram/asalomonalisa)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या