मुंबई, 22 जून : कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो बिग बॉसचा 13 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीझनचे स्पर्धक, लोकेशन आणि थीम बाबत वेगवेगळ्या माहितीचे अपडेट्स सतत मिळत आहेत. बिग बॉसचा 13 वा सीझन सुद्धा सलमान खान होस्ट करणार असून सध्या त्याच्या मानधनाची चर्चा सर्वत्र होत आहे. या सीझनसाठी सलमानला बरीच मोठी रक्कम मानधन म्हणून मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार सलमान खानला यंदाचा सीझन होस्ट करण्यासाठी बरीच मोठी रक्कम ऑफर करण्यात आली. या सीझनच्या प्रत्येक आठवड्यासाठी म्हणजेच दोन एपिसोडसाठी 31 कोटी एवढी रक्कम मानधन म्हणून देण्यात आल्याचं बोललं जात आहे. यंदाच्या सीझनमध्ये 13 विकेंड असणार आहेत त्यानुसार ही रक्कम 400 कोटींच्या आसपास असल्याचं समजतं. रिपोर्टनुसार, मागच्या वर्षी सलमाननं एका एपिसोडसाठी 12 ते 13 कोटी रुपये देण्यात आले होते. तर 11 व्या सीझनसाठी सलमाननं 11 कोटी घेतले होते. या हिशोबानं सलमानला 11 आणि 12 या दोन्ही सीझनमध्ये 300 ते 350 कोटी एवढं मानधन देण्यात आलं होतं.
बिग बॉसच्या 4 आणि 6 व्या सीझनसाठी सलमानला एका एपिसोडसाठी 2.5 कोटी रुपये देण्यात आले होते. त्यानंतर 7 व्या सीझनपासून ती रक्कम वाढवून 5 कोटी एवढी करण्यात आली. त्यानंतर सीझन 8 मध्ये 5.5 कोटी तर 9 व्या सीझनसाठी 8 कोटीचं मानधन देण्यात आलं होतं. सध्या सलमान त्याचा आगामी सिनेमा दबंग 3 च्या शूटिंगची जोरदार तयारी करत असून या सिनेमासाठी करत असलेल्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसतो
========================================================= चौथ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या तरुणाला जवानाने जीवाची बाजी लावून वाचवलं VIDEO