JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / नयनतारा-विघ्नेशला मोठा फटका; Netflix ने रद्द केली तब्बल 25 कोटींची डील,काय आहे नेमकं प्रकरण?

नयनतारा-विघ्नेशला मोठा फटका; Netflix ने रद्द केली तब्बल 25 कोटींची डील,काय आहे नेमकं प्रकरण?

Nayanthara-Vignesh Shivan Wedding Photos: साऊथमधील सर्वात चर्चित लग्नसोहळ्यांपैकी एक म्हणजे नयनतारा-विघ्नेश यांचा विवाहसोहळा होय. या जोडप्याने गेल्या महिन्यात लग्नगाठ बांधत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

0108

साऊथमधील सर्वात चर्चित लग्नसोहळ्यांपैकी एक म्हणजे नयनतारा-विघ्नेश यांचा विवाहसोहळा होय. या जोडप्याने गेल्या महिन्यात लग्नगाठ बांधत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

जाहिरात
0208

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या लग्नाचे स्ट्रीमिंग राईट्स नेटफ्लिक्सला 25 कोटी रुपयांना विकले गेले होते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांचं लग्न एखाद्या टीव्ही शोप्रमाणे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते.

जाहिरात
0308

परंतु आता, त्यांच्या लग्नाच्या शूटचं प्रसारण होणार नसल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सने स्टार कपलसोबतच्या डीलमधून माघार घेतली आहे.

जाहिरात
0408

गेल्या महिन्यात झालेल्या या शाही विवाहसोहळ्यात सिनेसृष्टीतील काही मोजक्याच सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं. सिनेनिर्माते बोनी कपूरपासून ते रजनीकांत, शाहरुख खान, मणिरत्नम, सुरिया, एआर रहमान, ऍटली, कार्ती, वसंत रवी, या टॉपच्या सेलेब्रेटींनी यावेळी हजेरी लावली होती.

जाहिरात
0508

काही रिपोर्ट्सनुसार सांगण्यात येत आहे की, नेटफ्लिक्सने त्यांच्या लग्नाचे स्ट्रीमिंग राईट्स 25 कोटी रुपयांना विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांना प्रचंड आनंद झाला होता.

जाहिरात
0608

मात्र इन्स्टाग्रामवर लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या आनंदात विघ्नेश शिवनने शेअर केलेल्या फोटोंमुळे स्ट्रीमिंग कंपनी निराश झाली आहे. आणि अशा परिस्थितीत त्यांनी या जोडप्याचे लग्न OTT प्लॅटफॉर्मवर न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
0708

वास्तविक नयनताराचा पती आणि साऊथ निर्माता विग्नेशला असं वाटत होतं की फार विलंब झाल्याने लग्नाचे फोटो बघण्यातील चाहत्यांचा रस कमी होईल.त्यामुळे त्याने एका महिन्यांनंतर आपल्या लग्नाचे काही अनसीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

जाहिरात
0808

अशा परिस्थितीत विघ्नेश आणि नयनताराला मोठा फटका बसला आहे.ओटीटीने आपला निर्णय मागे घेतला आहे. त्यांचे लग्नाचे फोटो-व्हिडीओ ओटीटीवर स्ट्रीम न झाल्याने या जोडप्यासह त्यांचे चाहतेही निराश झाले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या