JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Badhaai Do: चित्रपटगृहात पुन्हा परतला उत्साह, बँडबाजासह भूमि-राजकुमार पोहोचले स्पेशल स्क्रीनिंगला

Badhaai Do: चित्रपटगृहात पुन्हा परतला उत्साह, बँडबाजासह भूमि-राजकुमार पोहोचले स्पेशल स्क्रीनिंगला

राजकुमार राव आणि भूमी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला बँडसोबत डान्स करत पोहोचले होते. यादरम्यान दोघांनी खूप धमाल केली.

0108

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा 'बधाई दो' या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चित्रपटमागृहात उत्साह परतला आहे. हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, मुंबईच्या PVR येथे त्याचं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. जिथे राजकुमार-भूमी एका बँडसह वाजत गाजत पोहोचले होते.

जाहिरात
0208

2018 च्या 'बधाई हो' चित्रपटापेक्षा 'बधाई दो' ची कथा आणि पात्रे अतिशय वेगळी आहेत.त्यामध्ये आयुष्मान खुराना, गजराज राव, नीना गुप्ता आणि सान्या मल्होत्रा ​​यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

जाहिरात
0308

गेल्या काही काळापासून, ओटीटी प्लॅटफॉर्मवर एलजीबीटीक्यू समुदायाशी संबंधित कथा आणि पात्रांबद्दल खूप संवेदनशीलता आहे. परंतु हे नक्कीच पहिल्यांदाच आहे की राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर मोठ्या पडद्यावर फक्त त्यांच्या आव्हाने आणि अडचणीबद्दल बोलणारच नाहीत तर लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचाही प्रयत्न करणार आहेत.

जाहिरात
0408

'बधाई दो'मध्ये भूमी पेडणेकर लेस्बियनची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर राजकुमारही गेच्या भूमिकेत दिसणार आहे.

जाहिरात
0508

राजकुमार राव आणि भूमी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला बँडसोबत डान्स करत पोहोचले होते. यादरम्यान दोघांनी खूप धमाल केली. काळा चष्मा घालून दोघांनीही त्यांच्या चित्रपटातील गाण्यांवर जोरदार डान्स केला.

जाहिरात
0608

राजकुमार आणि भूमी व्यतिरिक्त 'बधाई दो' चित्रपटात शीबा चढ्ढा, लवलीन मिश्रा, नितीश पांडे आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी यांनी केले आहे.

जाहिरात
0708

यादरम्यान भूमी न्यूज प्रीटेंड ड्रेसमध्ये दिसली. तर, राजकुमार रावने लाल टी-शर्टसह पांढरा जॅकेट आणि न्यूड कलरची पॅंट घातली होती.

जाहिरात
0808

या चित्रपटात भूमी एका शाळेतील शारीरिक शिक्षण शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. तिला महिलांमध्ये रुची असते. त्याचंही एका मुलीवर प्रेम आहे. कौटुंबिक दबावाला कंटाळून ती एका पोलिसाशी (राजकुमार राव) लग्न करते. आता कथेत ट्विस्ट येतो जेव्हा राजकुमार देखील गे असल्याचे समोर येते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या