क्रिती सेनन
मुंबई, 18 ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनन यांच्या ‘भेडिया’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरच्या पहिल्या दोन पोस्टर्समुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. नुकतंच सोमवारी रिलीज झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये वरुणच्या लुकची जोरदार चर्चा झाली होती.दरम्यान आज क्रिती सेननचा जबरदस्त लुक समोर आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच अमर कौशिक दिग्दर्शित ‘भेडिया’ या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नुकतंच समोर आलेला क्रिती सेननचा लुक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. फक्त चाहतेच नव्हे तर आयुष्मान खुरानासह अनेक सेलिब्रिटीदेखील क्रितीचा लुक पाहून चकित झाले आहेत. क्रिती सेननने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘भेडिया’ मधील फर्स्ट लुक शेअर केला आहे. क्रितीचा असा लुक याआधी कोणी पाहिलेला नसेल. लहान केस, निळे डोळे यामध्ये क्रिती खूपच हॉट दिसत आहे. हातात इंजेक्शन घेऊन गूढपणे हसणारी क्रिती पाहणं रोमांचक आहे. (हे वाचा: Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चं शूटिंग सुरु; सेटवरील पहिली झलक आली समोर **)**
क्रिती सेनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या फर्स्ट लुकचा पोस्टर शेअर केला आहे. क्रितीने ‘भेडिया’ याचित्रपटाचं पोस्टर हिंदी-इंग्रजीमध्ये शेअर केलं आहे. क्रिती सेननने पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय की, ‘भेटा भेडियाची डॉक्टर अनिकाला, मानवा कृपया आपल्या जबाबदारीवर भेट द्या. भेडियाचा ट्रेलर उद्या खळबळ माजवून देईल.
क्रिती सेननने पोस्टर शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करत आहे. आयुष्मान खुरानाने पोस्टवर कमेंट करत ‘टू कूल’ लिहलं आहे. तर अश्विनी अय्यर तिवारीने हार्ट इमोजी शेअर करत तिचं कौतुक केलं आहे. दुसरीकडे चाहते १९ ऑक्टोबर म्हणजे उद्या रिलीज होणाऱ्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट येत्या २५ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.