JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Shubhangi Atre : 'भाभी जी घर पर है' फेम अभिनेत्रीच्या डोळ्यांची अशी झाली अवस्था, मध्येच थांबवावं लागलं शूटिंग

Shubhangi Atre : 'भाभी जी घर पर है' फेम अभिनेत्रीच्या डोळ्यांची अशी झाली अवस्था, मध्येच थांबवावं लागलं शूटिंग

‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारून लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे शुभांगी अत्रे. सध्या शुभांगी अत्रेविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

शुभांगी अत्रे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 डिसेंबर : ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारून लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे शुभांगी अत्रे. सध्या शुभांगी अत्रेविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीने प्रकृतीच्या कारणामुळे ‘भाबी जी घर पर हैं’ मालिकेचं शूटिंग थांबवलं आहे. त्यामुळे तिचे चाहतेही तिला काय झालंय याविषयी चिंतेत आहेत. शुभांगीने तिला नक्की काय झालं आहे याविषयी एका मुलाखतीत खुलासा केला आहे. ETimes ला दिलेल्या मुलाखतीत शुभांगीने सांगितले की, तिने काही दिवस शोचे शूटिंग थांबवले आहे. ती म्हणाली, मला डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागामध्ये खूप आग होत आहे. बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे माझ्या डोळ्यात फोडही झाले आहेत. मला 6 डिसेंबर रोजी या जीवाणूची लागण झाली. त्यानंतर मी रजा घेतली, पण आता सनग्लासेस लावून शूटिंग सुरू करणार आहे.शुभांगीने पुढे म्हणाली, मला खजुराहो फिल्म फेस्टिव्हलला जायचे होते तिथे ते माझा सत्कार करत होते. पण माझ्या डोळ्यांमुळे मला ते रद्द करावे लागले. मी तीन दिवस विश्रांती घेतली, पण अजूनही ती बरी झालेली नाही. पण काम चालूच राहिलं. आता मी सनग्लासेस घालून शूट करेन. अम्माजी अंगूरी भाभींना गॉगल घालायला सांगतील. यानंतर ती सनग्लासेससह शोची कथा पुढे नेणार आहे.

संबंधित बातम्या

तिचे डोळे अजूनही बरे झालेले नाहीत. ती सतत आवश्यक ती खबरदारी घेत असते आणि औषधेही घेत असते. ती डोळ्यांचा मेकअप पूर्णपणे टाळत आहे. यादरम्यान अभिनेत्रीने असेही सांगितले की, प्रॉडक्शन हाऊस माझ्यासोबत सहकार्य करत आहे. शुभांगी म्हणाली की पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी एक आठवडा लागेल. चाहते ती लवकरच बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे.

दरम्यान, शुभांगी या मालिकेपूर्वी एकता कपूरच्या कसौटी जिंदगी की शोमध्ये दिसली होती. याशिवाय तिने चिडिया घर, ये रिश्ता क्या कहलाता है यांसारख्या बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या