JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Ayushmann Khurrana ने घातला कचऱ्यापासून बनलेला जॅकेट; किंमत ऐकून व्हाल थक्क

Ayushmann Khurrana ने घातला कचऱ्यापासून बनलेला जॅकेट; किंमत ऐकून व्हाल थक्क

आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी ‘चंडीगढ करे आशिकी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 10 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र यादरम्यान अभिनेत्याचे जबरदस्त फॅशन स्टेटमेंट चर्चेत आहे

0108

रुपेरी पडद्यावर आयुष्मान खुरानाचा अभिनय खूपच पसंत केला जातो. ऑफबीट चित्रपटांमधील अभिनयामुळे या अभिनेत्याचे चाहतेही खूप आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारापासून ते फिल्मफेअर पुरस्कारापर्यंत सन्मानित आयुष्मान केवळ चांगले चित्रपटच करत नाही तर आलिशान जीवनशैली जगतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्षाला सुमारे 6 ते 7 कोटी कमावणारा अभिनेता सध्या त्याचा आगामी चित्रपट 'चंडीगढ़ करे आशिकी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.यादरम्यान अभिनेऱ्याने नुकताच एक फोटोशूट केलं आहे ज्यामुळे तो चर्चेत आहे.

जाहिरात
0208

आयुष्मान खुराना एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सुपर स्टायलिश गोल्ड आणि व्हाइट बॉम्बर जॅकेट घातलेला दिसला. पांढऱ्या पँटसह डिस्को स्टाइल जॅकेट आणि पांढऱ्या फुल टी-शर्टमध्ये अभिनेत्याच्या लूकची प्रशंसा केली जात आहे.

जाहिरात
0308

आयुष्मान खुरानाने परिधान केलेले स्टायलिश जॅकेट हे सामान्य जॅकेट नसून अतिशय खास आहे. हे जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

जाहिरात
0408

आयुष्मान खुरानाचे हे गोल्ड-व्हाइट जॅकेट डिझायनर गौरव गुप्ताने डिझाइन केले आहे. गौरवने यासाठी वापरलेले साहित्य अतिशय खास आहे.

जाहिरात
0508

आयुष्मान खुरानाचे हे जॅकेट इको-फ्रेंडली आहे. ते इकोकारीने तयार केले आहे. व्हाइट आणि गोल्ड ग्लायडेड बॉम्बर जॅकेट कचऱ्यापासून बवण्यात आलं आहे.

जाहिरात
0608

आयुष्मान खुरानाच्या या जॅकेटचे फॅब्रिक बिस्कीट रॅपर्स, समुद्रातून काढलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या अशा दैनंदिन वस्तूंचा पुनर्वापर करून तयार केले आहे.

जाहिरात
0708

सागरी कचऱ्यासोबत बायोडिग्रेडेबल उत्पादनांचा वापर करून हे सुंदर जॅकेट तयार करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची किंमत 60 हजार सांगितली जात आहे.

जाहिरात
0808

आयुष्मान खुरानाने ज्या पद्धतीने हे जॅकेट कॅरी केले आहे, ते बनवण्यामागचा हेतूही तितकाच सुंदर आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या