मुंबई, 16 सप्टेंबर : 2019 मध्ये आलेला ड्रीम गर्ल हा चित्रपट लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलेलं पहायला मिळालं. अशातच या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट ड्रीम गर्ल 2 चा उत्कृष्ट टीझर रिलीज झाला आहे. आयुष्मान खुरानाने सोशल मीडियावर ड्रीम गर्ल 2 चा टीझर शेअर केला आहे. या टीझर व्हिडिओसह ड्रीम गर्ल 2 ची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. आयुष्मानचा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आयुष्मान आणि अनन्या पांडे पहिल्यांदाच ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. ईदच्या मुहुर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार असून 29 जून 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज शांडिल्य या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.
अनु कपूर, मनजोत सिंग आणि विजय राज यांच्या व्यतिरिक्त परेश रावल, सीमा पाहवा, असरानी साब, मनोज जोशी आणि अनन्या पांडे हे कलाकार पहायला मिळणार आहेत. पहिल्या भागापेक्षा या सीक्वलमध्ये काय वेगळं असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ड्रीम गर्ल 2 च्या रिलीज डेटमुळे अभिनेता कार्तिक आर्यनची चिंता वाढली आहे. कारण पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट सत्य प्रेम की कथा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी जबरदस्त टक्कर होणार आहे.