हॉलिवूड सिनेमा अव्हेंजर एण्ड गेम येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाच्या पाच दिवस आधीच हा शो अनेक ठिकाणी हाऊसफूल झाला आहे.
मुंबई, 26 एप्रिल : मार्वल फ्रेंचाइजीचा ‘अॅव्हेन्जर्स: एन्डगेम’ हा सिनेमा आज (26 एप्रिल) भारतात रिलीज झाला. रिलीजच्या आधीपासूनच या सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. प्रति सेकंद 18 टिकीटे अशी या सिनेमाची तिकीट विक्रीही झाली. मात्र सिनेमाच्या रिलीजनंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या अफलातून प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. सगळीकडेच या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षक सोशल मीडियावर भावूक झालेले दिसले. अॅक्शन आणि इमोशन्सनी भरलेला असा हा सिनेमा असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या. ट्रेंड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी या सिनेमाला 5 स्टार दिले आहेत. ते म्हणतात, हा सिनेमा परफेक्ट एंटरटेनर आहे. यात सर्वकाही आहे. मस्ती, इमोशन्स, अॅक्शन आणि क्लेवर स्क्रिनप्ले.
याशिवाय इतर अनेक नेटीझन्सनी या सिनेमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पोस्ट केल्या. एका युजरनं लिहिलं, मी कधीच एका सुपर हिरोच्या सिनेमानंतर रडलो नाही मात्र हा सिनेमा वेगळा आहे. हा खरं तर खूप मोठा सिनेमा आहे.
तर दुसऱ्या एका युजरनं या सिनेमाचं कौतुक करताना म्हटलं, मला नाही वाटतं मी पुन्हा कधी या सिनेमासारखा कोणता सिनेमा पाहू शकेन. हा सिनेमा एक मास्टर पीस आहे.
अॅव्हेन्जर्स: एन्डगेम या सिनेमाचं दिग्दर्शन अँथोनी आणि जो रुसो यांनी केलं आहे. या सिनेमात क्रिश एवांस, रॉबर्ट ड्राउनी जूनियर, ब्राई लॉर्सन, क्रिस हेम्सवर्थ, जोश ब्रोलिन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाच्या आधीचा भागही बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. एवेंजर्स: एंडगेम हा मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा 22 वा सिनेमा आहे.