आशा भोसले-जनाई भोसले
मुंबई, 14 जानेवारी- आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांनाच संमोहित करणाऱ्या ज्येष्ठ गायिका म्हणजे आशा भोसले होय. मंगेशकर घराण्याच्या गायनाचा वारसा तितक्याच प्रतिष्ठेने त्या आज चालवत आहेत. आशाताईंना नेहमीच त्यांच्या मनमोकळ्या आणि विनोदी स्वभावासाठी ओळखले जाते. बदलत्या पिढीनुसार त्यांनी स्वतःमध्ये तो-तो बदल केलेला दिसून येतो. आशाताई आपल्या नातीच्या फारच जवळ आहेत. त्या एखाद्या मैत्रिणीप्रमाणे राहतात. आशा भोसलेंची नात जनाई नेहमीच आपल्या आजीसोबत दिसून येते. कधी त्या एकमेकींसोबत गप्पा मारताना तर कधी विविध रेस्टोरंटसमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसून येतात. दरम्यान आशाताईंनी नुकतंच नात जनाई चा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले आपल्या मनमोकळ्या स्वभावाने सर्वांचं मन जिंकून घेतात. त्यांच्याकडे पाहून वय हा फक्त एक आकडा असतो या वाक्यावर विश्वास बसतो. आशाताई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्या सतत विविध पोस्ट शेअर करुन सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. नात जनाईसोबतसुद्धा आशाताई सतत फोटो शेअर करत असतात. या दोघींमध्ये फारच छान बॉन्डिंग आहे. जनाई सतत आशाताईंसोबत बाहेर फेरफटका मारताना आणि मजामस्ती करताना दिसून येते. **(हे वाचा:** VIDEO: गायिका आशा भोसले नातीसोबत डिनर डेटवर; अभिनेत्रींना टक्कर देते जनाई ) नुकतंच जनाईने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळीसुद्धा आशाताई आणि जनाई एकत्र दिसून आल्या. प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर जनाईच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. जनाईच्या बर्थडे पार्टीमध्ये आशाताई जनाईसोबत माध्यमांशी बोलताना दिसून आल्या. यावेळी त्यांनी सुंदर अशी साडी परिधान केली होती. तर जनाईने हिरव्या रंगाचा सुंदर असा वेस्टर्न गाऊन परिधान केला होता. यामध्ये आजी आणि नात दोघीही फारच सुंदर दिसत होत्या.
आशाताईंची नात जनाईने यावेळी मीडियासोबतसुद्धा केक कट करत वाढदिवस साजरा केला. यावेळी आशाताईसुद्धा उपस्थित होत्या. दोघीनी कॅमेऱ्याला पोझसुद्धा दिल्या. विशेष म्हणजे जनाईच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसुद्धा उपस्थित होती. श्रद्धा आणि जनाईने एकत्र येत मीडियाला पोझ दिल्या. दोघीही फारच उत्सहात दिसत होत्या.
जनाई सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. दिसायलासुद्धा ती एखाद्या अभिनेत्री इतकीच स्टायलिश आणि सुंदर आहे. जनाईला गायनाची प्रचंड आवड आहे. तिला गायन क्षेत्रात आपलं करिअर करायचं आहे. ती सतत सोशल मीडियावर आजीसोबतचे व्हिडीओ फोटो शेअर करत असते.