मुंबई, 9 फेब्रुवारी- ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) चा विजेता पवनदीप राजनच्या बहिणीचं (Pawandeep Rajan Sister) म्हणजेच चांदनी राजन (Chandani Rajan) हिचं लग्न उत्तराखंडमध्ये पार पडलं. पवनदीपच्या बहिणीच्या हळदी समारंभाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अरुणिता कांजीलालही (Arunita Kanjilal) दिसत आहे. यावरून या लग्नसोहळ्यात अरुणिताही सहभागी झाल्याचं स्पष्ट होतं. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.आणि पुन्हा एकदा अरुणिता आणि पवनदीपच्या लव्हस्टोरीच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अरुणिता पवनदीपची बहीण चांदनीला हळदी लावताना दिसत आहे. यावेळी तिनं ट्रॅडिशनल सूट घातला असून पवनदीपने कुर्ता पायजमासोबत डोळ्यावर स्टायलिश गॉगलसुद्धा घातला आहे. ‘इंडियन आयडॉल 12’ मधील स्पर्धकांच्या गाण्याव्यतिरिक्त पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्या जोडीचीसुद्धा प्रचंड चर्चा होती.
दोघांच्या केमिस्ट्रीचं लोकांनी खूप कौतुकही केलं होतं. या सर्वात दोघांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. यामुळेच लोकांनी पवनदीपला शोचा विजेतादेखील बनवलं होतं. तर अरुणिता या शोची फर्स्ट रनर अप ठरली होती. शो संपल्यानंतर पवनदीप आणि अरुणिताची केमिस्ट्री एका गाण्याच्या रूपाने समोर आली होती.जेव्हा पवनदीप आणि अरुणिताचं पहिलं रोमँटिक गाणं ‘मंजूर दिल’ रिलीज झालं होतं तेव्हा प्रेक्षकांनी या गाण्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला होता. (हे वाचा: Shahrukh Khan च्या लेकीला आठवले कॉलेजचे दिवस, Suhanaने शेअर केले थ्रोबॅक PHOTO ) इंडियन आयडॉल 12 या सीजनदरम्यान, पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्या जोडीची तुफान चर्चा होती. या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु दोघांनीही ही बातमी पूर्णपणे अफवा असल्याचं म्हटलं होतं. . पवनदीप आणि अरुणिता यांनी अनेक मुलाखतींमध्ये हे स्पष्ट केलं आहे की, दोघेही फक्त एक चांगले मित्र आहेत. पण दोघांची ही जोडी आयुष्यभराची असावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.आता हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या वाढल्या आहेत.