मुंबई, 13 सप्टेंबर- कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आणि सुपरस्टार गोविंदाची भाची अभिनेत्री आरती सिंहचा एक व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओने सर्वांनाच धक्का दिला आहे. परंतु हा एक सुखद धक्का आहे असंच म्हणावं लागेल. अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वच आहेत. अभिनेत्रीनं अवघ्या 18 दिवसांत तब्बल 5 किलो वजन कमी केलं आहे. आरती सिंहने स्वतः एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आरती सिंहने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून भल्या भल्यांनी तोंडात बोटे घातली आहे. त्याचं कारणही तितकंच रंजक आहे. अभिनेत्रीने चक्क 18 दिवसांत 5 किलो वजन कमी केलं आहे. शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आरती जिममध्ये घाम गाळताना दिसून येत आहे. सोबतच अभिनेत्रीने कॅप्शन लिहत ट्रान्सफॉर्मेशनचा काळ नमूद केला आहे. आरती सिंहने आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आपली फिटनेस जर्नी दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये आरती हेव्ही वेट उचलताना दिसून येत आहे. आरतीचं जबरदस्त डेडिकेशन आणि हार्ड वर्कमुळे हे ट्रान्सफॉर्मेशन शक्य झालं आहे. आरतीने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे की, तिने 18 दिवस 71. 21 ते 66. 84 असं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे. अवघ्या काहीच अभिनेत्रीने 5 किलो वजन कमी केल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. तर हा व्हिडीओ पाहून अनेकांना वजन कमी करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
**(हे वाचा:** Koffee With Karan : 65 व्या वर्षी फिट राहण्यासाठी अनिल कपूर करतात ‘हे’ काम; ऐकून बसेल मोठा झटका ) हा व्हिडीओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहते आणि सेलिब्रेटी प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स देत आश्चर्य व्यक्त करत आहेत. आरती सिंहची मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईने आपल्या मैत्रिणीच्या वेट लॉस जर्नीवर आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलं आहे. आरती सिंह छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय चेहरा आहे. आरती सिंहने उतरन, परिचय, वारीस अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सोबतच बिग बॉससारख्या अनेक रिऍलिटी शोमध्येही ती झळकली आहे.