सलमान आणि केआरकेमधील वादात अर्शी खाननं घेतली उडी
अभिनेता कमाल आर. खान आणि सलमान खान यांच्यात सध्या शाब्दिक द्वंद्व सुरु आहे. केआरकेनं सलमानच्या चित्रपटांवर जोरदार टीका केली. परिणामी संतापलेल्या भाईजाननं त्याच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकला.
सलमान आणि केआरकेमधील वाद कोर्टात सुरु असतानाच यामध्ये आता अभिनेत्री अर्शी खान हिने उडी घेतली आहे. तिने केआरकेला सलमानची माफी मागण्यास सांगितली आहे. अर्थात तिची ही मागणी त्यानं फेटाळून लावली.
लिडिंग डेलीला दिलेल्या मुलाखतीत अर्शीनं सलमान-केआरकेमधील वादावर भाष्य केलं. ती म्हणाली, “केआरकेनं हा खेळ केवळ प्रसिद्धीसाठी सुरु केला. त्याने हा प्रकार त्वरित थांबवावा. अन्यथा या प्रकरणात त्याचच नुकसान होईल.”
“मी केआरकेला फोन करुन सलमानची माफी मागण्यास सांगितलं होतं. परंतु त्यानं मला फेटाळून लावलं. सध्या तो स्वत:च्याच मस्तीत आहे. पण लवकरच कळेल त्याला तो काय चूक करतोय ती.”
अर्शी खान देखील आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदीसोबत असलेल्या अफेअरमुळे ती चर्चेत आली होती. यापूर्वी केआरकेनं तिच्यावर देखील टीका केली होती.