बॉलिवूड, टीव्ही जगतातील अनेक सेलेब्ससह त्यांच्या घरच्यांना देखील कोरोना झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आता मराठी मनोरंजन विश्वात देखील हा कोरोना कहर दिसून येत आहे. आजच्या दिवसात गौतमी देशपांडे आणि अरोह वेलणकर याला कोरोनाची लगाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
बॉलिवूड, टीव्ही जगतातील अनेक सेलेब्ससह त्यांच्या घरच्यांना देखील कोरोना झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आता मराठी मनोरंजन विश्वात देखील हा कोरोना कहर दिसून येत आहे. आजच्या दिवसात गौतमी देशपांडे आणि अरोह वेलणकर याला कोरोनाची लगाण झाल्याची माहिती समोर आली आहे,
'माझा होशील ना' (Maza Hoshil Na) फेम अभिनेत्री गौतमी देशपांडेला (Gautami Deshpande) कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियाद्वारे सर्वांना याची कल्पना दिली आहे.
अभिनेता जितेंद्र जोशीलाही कोरोनाची लागण झाली आहे. जितेंद्रने सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयीची माहिती दिली आहे.
देशातील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान लता मंगेशकर यांची भाची रचना शाहने यांनी आज त्यांची हेल्थ अपडेट दिली आहे.लता दीदींची प्रकृती कशी आहे? याबद्दल सांगताना रचना शाह म्हणाल्या, 'त्यांची प्रकृती स्थिर आहे परंतु सध्या त्यांना ऑक्सिजचा आधार देण्यात आला आहे. त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयात राहावं लागणार आहे.
आई कुठे काय करते मधील संजना फेम रूपाली भोसले हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तिनं सोशल मीडियाच्या माध्यामातून ही माहिती दिली. सध्या ती घरी राहून योग्य ती काळजी घेत आहे.
अंकुश चौधरी याला देखील काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्ववीट करत याची माहिती दिली होती.
अभिनेत्री नेहा पेंडसेला देखील कोरोना झाला आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिलं होते की, ' अखेर दुर्दैवाने मला कोरोनने गाठलं. मला कोरोनाची लागण झाली आहे.मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. मी कोरोना नियमांचं पालन करून योग्य ती काळजी घेत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉस मराठी तीनच्या उत्साही स्पर्धक तृप्ती देसाई यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडिआ पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
'कारवां' (Karwaan) फेम अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) हिचा देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सोशल मीडिया पोस्ट करत तिनं माहिती दिली आहे.