JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अर्जुन रामपाल आणि सोनू सुदनं केला लष्कराला सलाम

अर्जुन रामपाल आणि सोनू सुदनं केला लष्कराला सलाम

अर्जुन रामपाल आणि सोनू सूद यांचा पलटन सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. हा एक युद्धपट आहे. त्यानिमित्तानं आम्ही अभिनेता अर्जुन रामपाल आणि सोनू सुद यांना गाठलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिखा धारिवाल, मुंबई, 29 आॅगस्ट : अर्जुन रामपाल आणि सोनू सूद यांचा पलटन सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. हा एक युद्धपट आहे. त्यानिमित्तानं आम्ही अभिनेता अर्जुन रामपाल आणि सोनू सुद यांना गाठलं. दोघांनीही आमच्याची मनमोकळी बातचीत केली. डोकलामचा वाद संपत आलाय तरीही चिनी सैन भारतीय सीमेत घुसखोरी करतच असतं. याबद्दल सोनू सुदला विचारलं असता तो म्हणाला, ‘जागा बदलल्या तरी चिनी सैन्याच्या कारवाया सुरूच आहेत. त्यांना वाटतं, तो त्यांचा भाग आणि आम्हाला वाटतं हा आमचा भाग. नक्की सीमा कुठली हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे.’ यावेळीही ईदच्या दिवशी काश्मीरमध्ये दगडफेक झाली होती. भारतीय लष्करावर दगड मारले गेले होते. यावर सोनू सूदनं राग व्यक्त केला. तो म्हणाला, ’ लष्करावर दगड मारणारे जनावरच आहेत. या लोकांना लष्कर वठणीवरही आणतं. पण कडक कायदा बनला पाहिजे. लष्करावर दगडफेक करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ’ तो पुढे म्हणाला, ’ कदाचित हे त्यांच्याकडून कोणी करवून घेत असेल. असं कृत्य करणारे भारतीय अजिबातच नाहीत.’ सीमा रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं. त्यावेळी सैन्याला उत्तर द्यायला हवं की नाही? या प्रश्नाचं उत्तर अर्जुन रामपालनं दिलं. तो म्हणाला, ’ मला याबद्दल जास्त काही माहीत नाही. पण कुठल्याही अधिकाराचा गैरवापर होऊ नये, इतकंच. शिवाय आपलं लष्कर बरंच काही करत असतं. आता केरळला पूर आला तेव्हा भारतीय सैन्यच मदतीला धावून आलं होतं. पूरग्रस्तांसाठी ते देवच बनले. ’ केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बाॅलिवूड पुढे सरसावलंय. यावर अर्जुन म्हणाला, ‘कुठलंही संकट आलं, तर आयुष्य उद्धवस्त होऊन जातं. तेव्हा आपण मानवता जोपासली पाहिजे. आणि पुन्हा उभं राहण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे.’ यावर सोनू सुदही म्हणाला, ’ केरळ पुन्हा उभं राहतंय, यात लष्कराचं योगदान आहे. आपण पण यात मदत केली पाहिजे. आणि सुरूही आहे. केरळची समृद्धी पुन्हा एकदा दिसायला लागेल.’ पलटन येत्या 7 सप्टेंबरला रिलीज होतोय. जे.पी.दत्तांचं दिग्दर्शन आहे. अर्जुन आणि सोनूशिवाय या सिनेमात जॅकी श्राॅफ, ईशा गुप्ता हेही कलाकार आहेत. VIDEO : तरुणाच्या हत्येची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या