प्रसिद्ध गायिकेनं केलं लग्न; लग्नात आई-वडिलांना सुद्धा दिलं नाही आमंत्रण
लास्ट ख्रिसमस, साईड टू साईड, बँग बँग यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमधून लोकप्रिय झालेली एलियाना ग्रँड ही आज पाश्चात्य संगीत विश्वातील एक नामांकित गायिका म्हणून ओळखली जाते.
खरं तर एलियानाला मोठ्या थाटामाटात लग्न करायचं होतं पण कोरोनामुळं तिला ते शक्य झालं नाही. ऑनलाईन लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून तिचे कुटुंबीय आणि मित्र मंडळी या लग्नाला उपस्थित होते.
लक्षवेधी बाब म्हणजे त्यांच्या लग्नाला एकही पाहुणा उपस्थित नव्हता. तरी देखील या लग्नासाठी त्यांना जवळपास 100 कोटी रुपयांचा खर्च करावा लागला.
खरं तर हे वाचून तुम्ही चकित झाला असाल पण एलियाना आणि डेल्टननं नुकतंच एक घर खरेदी केलं. जवळपास सहा एकरमध्ये पसरलेल्या या घराची किंमत 80 कोटींच्या आसपास आहे. शिवाय त्यामधील फर्निचर आणि इतर सजावटीसाठी त्यांना 20 लाखांपेक्षा अधिक खर्च करावा लागला.
या नव्या घरातच दोघांना लग्न करायचे होते. किंबहुना लग्न करण्याचा निर्णय घेताच त्यांनी हे घर खरेदी केलं. अन् या नव्या घरात लग्न करुन नव्या संसाराची सुरुवात केली.
एलियाना ग्रँड ही जगातील सध्याची सर्वाधिक मानधन घेणारी फिमेल पॉप सिंगर म्हणून ओळखली जाते. वर्षाला जवळपास 600 कोटी रुपयांची कमाई ती करते.