आराध्या बच्चन एक दिवस देशाची पंतप्रधान होणार, हैद्राबादच्या ज्योतिषाचं भाकित

आराध्या बच्चन एक दिवस देशाची पंतप्रधान होणार. असं दचकू नका. हे आम्ही नाही सांगत. असं भाकीत हैद्राबादचे प्रसिद्ध ज्योतिषी ग्यानेश्वर यांनी नोंदवलंय.

Sonali Deshpande
हैद्राबाद, 26 जून : आराध्या बच्चन एक दिवस देशाची पंतप्रधान होणार. असं दचकू नका. हे आम्ही नाही सांगत. असं भाकीत हैद्राबादचे प्रसिद्ध ज्योतिषी ग्यानेश्वर यांनी नोंदवलंय. ग्यानेश्वर यांनी चिरंजीवी आणि रजनीकांत एक दिवस राजकारणात जाणार हे नोंदवलेलं भाकित खरं ठरलं.तर मोदी हेच 2019 नंतर देशाचे पंतप्रधान असतील असंही त्यांनी सांगितलंय. मात्र आराध्याबाबत भाकीत नोंदवताना तिला राजकारणात यश मिळेल, मात्र त्यासाठी तिने तिचं अाराध्या नाव बदलून रोहिणी करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.आराध्या  बच्चन गेल्या वर्षी आई ऐश्वर्या रायसोबत कान फिल्म फेस्टिवलला गेली होती. तिथं तिनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अमिताभ -जया यांच्यासारखे आजी आजोबा, ऐश्वर्या-अभिषेकसारखे आई-वडील असताना आराध्या अभिनयाकडेच वळेल असं वाटतं. पण आता या ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरेल का हे काळच ठरवेल.

Trending Now