JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘हे माझं शरीर आहे, मी काहीही घालेन..’; अनुराग कश्यपची मुलगी ट्रोलर्सवर बरसली

‘हे माझं शरीर आहे, मी काहीही घालेन..’; अनुराग कश्यपची मुलगी ट्रोलर्सवर बरसली

बोल्ड फोटोंमुळं अनुराग कश्यपच्या मुलीला मिळाल्या बलात्काराच्या धमक्या; ट्रोलर्सवर संतापताच बॉलिवूड अभिनेत्रींनीही केली स्तुती

0110

सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलंसुद्धा चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे आलिया कश्यप. Anurag Kashyap's daughter Aaliyah (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0210

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची ही मुलगी कोणत्या ना कोणत्या कारणानं नेहमीच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0310

तिनं अद्याप सिनेसृष्टीत पदार्पण केलेलं नाही पण तिचा फॅशन सेन्स, कपडे, राहणीमान, मित्र-मैत्रिणी यांच्याविषयी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0410

यावेळी आलियानं स्वत:चे काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0510

मात्र हे फोटो पाहून काही नेटकरी तिच्यावर संतापले. त्यांनी आलियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी तर तिला थेट बलात्काराच्या धमक्या देखील दिल्या होत्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0610

तुझ्यासारख्या मुलींमुळं देशभरातील स्त्रियांकडे वाईट नजरेनं पाहिलं जातं अशा आशयाच्या प्रतिक्रिया तिच्या या फोटोंवर येऊ लागल्या होत्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0710

मात्र या ट्रोलर्सला आता आलियानं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0810

“हे माझं शरीर आहे. मी कुठलेही कपडे घालेन, कशीही वागेन तुम्हाला काय करायचं आहे. जर तुम्हाला माझं वागणं पटत नाही तर तुम्ही माझे फोटो का पाहाता?” असा रोखठोक सवाल तिनं या ट्रोलर्सला केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0910

तिनं दिलेल्या या प्रत्युत्तराची खुशी कपूर आणि अलायवा जाफरी या स्टारकिड्सनं देखील स्तुती केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
1010

आलिया सध्या कॅलिफोर्नियामध्ये चित्रपट निर्मितीचं प्रशिक्षण घेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या