JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / रुग्णालयातील परिचारीका कशी झाली प्रसिद्ध अभिनेत्री? पाहा अनुप्रियाचा थक्क करणारा प्रवास

रुग्णालयातील परिचारीका कशी झाली प्रसिद्ध अभिनेत्री? पाहा अनुप्रियाचा थक्क करणारा प्रवास

छोट्या गावातून आलेली मध्यमवर्गीय घरातील अनुप्रिया कशी झाली बॉलिवूड अभिनेत्री?

0110

अनुप्रिया गोएंका ही बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Anupriya Goenka/Instagram)

जाहिरात
0210

अत्यंत लहान लहान भूमिका साकारत वेळप्रसंगी बॅकस्टेज काम करुन तिनं बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवले. (Anupriya Goenka/Instagram)

जाहिरात
0310

अन् त्यानंतर संधी मिळताच तिनं ‘वॉर’, ‘ढिशूम’, ‘टायगर जिंदा है’, ‘पाठशाला’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या दर्जेदार अभिनयाचं प्रदर्शन केलं. (Anupriya Goenka/Instagram)

जाहिरात
0410

अनुप्रियाचा जन्म 29 मे 1987 रोजी कानपूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. आज वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Anupriya Goenka/Instagram)

जाहिरात
0510

शाळेत असल्यापासून तिला अभिनयाची आवड होती पण फावल्या वेळेत ती वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करायची. (Anupriya Goenka/Instagram)

जाहिरात
0610

2008 मध्ये अनुप्रिया मुंबई काम मिळवण्यासाठी मुंबईत आली. सुरुवातीला तिनं कॉलसेंटरमध्ये नोकरी केली. एका खासगी रुग्णालयात ती परिचारिका म्हणूनही काम करत होती. (Anupriya Goenka/Instagram)

जाहिरात
0710

शिवाय तिनं व्यावसायिक जाहिरातींमध्ये काम केलं. त्यामध्ये ती यूपीए सरकारच्या भारत निर्माण मोहिमेचा भागही बनली होती. (Anupriya Goenka/Instagram)

जाहिरात
0810

2017 मध्ये टायगर जिंदा है या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात ती परिपूर्णा परिचारिकाची भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटात छोटी भूमिका होती मात्र तरीही तिनं ही भूमिका साकारली. (Anupriya Goenka/Instagram)

जाहिरात
0910

पुढे पद्मावत या चित्रपटात तिनं शाहिद कपूरच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारली होती. यामध्ये तिनं केलेल्या अभिनयाची सर्वांनीच स्तुती केली होती. (Anupriya Goenka/Instagram)

जाहिरात
1010

अनुप्रियाला खरी लोकप्रियता मिळाली ती आश्रम या वेब सीरिजमुळं. अन् आज ती बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Anupriya Goenka/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या