कुंडली न जुळल्यामुळं मोडलं लग्न; जसलीनची लव्ह स्टोरी राहिली अर्धवट
या शोमध्ये तिनं भजन सम्राट अनुप जलोटा यांच्यासोबत अफेअर केलं होतं. विशेष म्हणजे 67 वर्षीय अनुप यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळं तिनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. (Jasleen Matharu/Instagram)
आज जसलीनचा वाढदिवस आहे. 31 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Jasleen Matharu/Instagram)
बिग बॉसमधून बाहेर पडताच तिनं अनुप यांच्यासोबत असलेल्या नात्यावर स्पष्टीकरण देखील दिलं होतं. दोघांचं अफेअर हा शोमधील स्क्रिप्टचा भाग होता पण प्रेक्षकांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. (Jasleen Matharu/Instagram)
यानंतर सजलीन अमेरिकन कॉस्मेटिक सर्जन डॉ. अभिनीत गुप्ता याला डेट करत होती. (Jasleen Matharu/Instagram)
दोघं लग्न देखील करणार होते. मात्र दोघांची कुंडली न जुळल्यामुळं त्याचं लग्न मोडलं. (Jasleen Matharu/Instagram)
येत्या काळात जसलीन ‘वो मेरी स्टूडेंट है’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Jasleen Matharu/Instagram)
लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटात देखील ती अनुप जलोटा यांच्यासोबतच रोमान्स करताना दिसणार आहे. त्यामुळं दोघांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहं. (Jasleen Matharu/Instagram)
अलिकडेच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. यामध्ये जसलीनचा हॉट अवतार पाहायला मिळत आहे. (Jasleen Matharu/Instagram)