मुंबई, 01 सप्टेंबर : सिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) याच्या मृत्यूनंतर बॉलीवूड क्षेत्रात जबर धक्का बसला. सुशांतच्या मृत्यू मागे नेमकं कोण जबाबदार आहे याचा छडा अद्याप लागलेला नाही. सीबीआय बरोबरच देशातील विविध मोठ्या संस्था सुशांतच्या मृत्यू मागील कारण शोधत आहेत. सुशांतला जाऊन अनेक दिवस झाले तरी अद्यापही सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याच्या आठवणी शेअर करीत दुःख व्यक्त करीत आहेत. अशातच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (ankita lokhande) हिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. अंकितासह काही मित्र-मैत्रिणींसोबत गेलेल्या सहली दरम्यान हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना अंकिताने शेरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये ती म्हणते, काश तूने ये उड़ान भरी ही ना होती यार मेरे, यां फ़िर काश तू जुड़ा रहता उन सब से जो तुझे तेरी जड़ों से जोड़े रखते थे. यूं तो शायद इतना तुझे याद ना करते हम यार, क्यूंकि तू मसरूफ था, खुश दिखता था खुद की चुनी हुई नयी दिलचस्प गलियों मे, हम भी तेरे यार खुश थे. या व्हिडिओमध्ये मागून किंचाळण्याचा आवाज नाही येत आहे ही व्यक्ती सुशांतला गुड्डू म्हणून संबोधत आहे.