रेड कलरचा बाथरोब, मोकळे केस, न्यूड मेकअप अशा अवतारात अंकिता खूपच हॉट दिसत आहे.
‘मणिकर्णिका’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आताही तिनं बाथरोबमधील काही फोटो शेअर केले आहेत.
रेड कलरच्या बाथरोबमध्ये अंकिता खूपच हॉट दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अंकितानं लिहिलं, Mirror and I, in deep conversation!!!
मोकळे केस, न्यूड मेकअपमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत आहे. आरशासमोर बसून अंकितानं वेगवेगळ्या कॅन्डिड पोज दिल्या आहेत. ज्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अंकिताच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिनं मणिकर्णिका सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात तिनं झलकरीबाईची भूमिका साकारली होती.
यानंतर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘बागी 3’ मध्ये तिनं रुची नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं.
अंकितानं पवित्र रिश्ता या मालिकेतून बरीच प्रसिद्ध मिळवली होती. याच मालिकेतील तिचा को-स्टार सुशांत सिंह राजपूतसोबतचं तिनं नातंही बराच काळ चर्चेत राहिलं मात्र नंतर या दोघांनी ब्रेकअप केलं.
सध्या अंकिता बिझनेसमन विकी जैनला डेट करत आहे. लवकरच हे दोघं लग्न करतील अशा चर्चा देखील सुरू आहे.तर दुसरीकडे तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूत अभिनेत्री रिया चक्रवर्तीशी रिलेशनशिपमध्ये आहे.