JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सस्ती कंगना'; 'त्या' गोष्टीवरुन अंकिता लोखंडे होतेय ट्रोल, पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय VIRAL VIDEO

'सस्ती कंगना'; 'त्या' गोष्टीवरुन अंकिता लोखंडे होतेय ट्रोल, पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय VIRAL VIDEO

‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. या मालिकेमुळे अंकिताला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. अंकिता ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

जाहिरात

अंकिता लोखंडे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 ऑक्टोबर : ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. या मालिकेमुळे अंकिताला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. अंकिता ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. नवनवीन फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच अंकिताचा एक नवीन व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये ती विकीसोबत दिसत आहे. मात्र या व्हिडीओमधील तिच्या लुकवर सध्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. अंकिता लोखंडे नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी अंकितानं साडी परिधान केली होती. तिनं परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या शिफॉन साडीने चाहत्यांची मनं जिंकली. चाहत्यांनी तर तिचं कौतुक केलं मात्र नेटकऱ्यांनी तिला तिच्या वेशभुषेवरुन ट्रोल केलेलं पहायला मिळालं. अनेकांनी तिला तिच्या लुकवरुन सस्ती कंगना असल्याचं म्हटलंय. तिनं काहीसा कंगनासारखा लुक केल्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीये.

संबंधित बातम्या

अंकिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तिच्या या व्हिडीओवर लाईक्ससोबत कमेंटचाही वर्षाव होत आहे. ‘सस्ती कंगना, बॅकलेस, साडीची इन्सल्ट, साडी थोडी अजून खाली नेसायची, साडी कुठे टक केलीये’, अशा अनेक कमेंट व्हिडीओवर येत आहे.

दरम्यान, अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक चांगल्या गोष्टी घडत आहेत. दोघेही सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अंकिता गरोदर असल्याच्याही बातम्या पसरल्या होत्या. मात्र ती एक अफवा असून मी प्रेग्नेंट नाहीये, असं अंकितानं सांगितलं होतं. मात्र तिचे चाहते ही गुडन्यूज ऐकण्यासाठी वाट पाहत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या