‘कॉफी विथ करण’ करण जोहरचा हा चॅट शो सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारणसुद्धा असंच आहे. या शोमध्ये बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय कलाकार हजेरी लावतात.
'कॉफी विथ करण' करण जोहरचा हा चॅट शो सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारणसुद्धा असंच आहे. या शोमध्ये बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय कलाकार हजेरी लावतात.
हे कलाकार फक्त हजेरी लावत नाहीत, तर आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत चकित करणारे खुलासेदेखील करतात.
नुकतंच या 'कॉफी विथ करण 7' च्या चौथ्या एपिसोडमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांनी उपस्थिती लावली होती. सोबतच त्यांनी अनेक खुलासेदेखील केले आहेत.
यावेळी करण जोहरने स्वतः खुलासा करत सांगितलं की, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अनन्या पांडेचा बालपणापासूनचा क्रश आहे.
यावर करणने अनन्याला विचारलं, बालपणापासून आर्यन तुझा क्रश असतानासुद्धा तुमच्यात लिंकअप का नाही झालं?
यावर उत्तर देत अनन्याने म्हटलं, 'हे तुम्ही त्यालाच जाऊन विचारा'. या सर्व प्रक्रारावर आता सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे.
आर्यन खान, सुहाना खान आई अनन्या पांडे बालपणापासूनचे मित्र आहेत. सुहाना आणि अनन्या पांडे तर बेस्ट फ्रेंड्स आहेत.