लग्नाआधीच गरोदर राहिल्यामुळे तिच्या नावाची बी- टाऊनमध्ये चर्चा सतत होत असते. सोशल मीडियावर ही ती सक्रीय असून अनेकदा बेबी बंपसह स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.
बॉलिवूडपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सिनेमांमध्ये काम केलेली अभिनेत्री अॅमी जॅक्सन गरोदर असून हे दिवस ती एन्जॉय करताना दिसत आहे.
लग्नाआधीच अॅमी गरोदर राहिल्यामुळे तिच्या नावाची बी- टाऊनमध्ये चर्चा झाली होती. अॅमी सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती बेबी बंपसह स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.
दरम्यान तिने बॉयफ्रेंडसोबतचा अजून एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून तो कमालिचा व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये अॅमी प्रियकरासोबत रोमँटिक डेटवर आल्याचं दिसतं. सध्या प्रत्येक दिवस मनमुरादपणे जगणारी एमी यात प्रियकराला किस करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती अल्ट्रासाउंड करताना दिसत आहे.
हे दोन्ही फोटो शेअर करताना अॅमीने लिहिले की, ‘मी या आयुष्यात एका गोष्टीबद्दल निश्चित आहे की, तू सर्वोत्कृष्ट बाबा होशील.’
एमीच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच ती रजनीकांत यांच्यासोबत २.० सिनेमा दिसली होती. या सिनेमात अक्षय कुमारने खलनायकाची भूमिका साकारली होती.