अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) सोशल मीडियावरील बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे सातत्याने ट्रोल होत आली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) आजकाल सिनेमांमुळे नाही, तर तिच्या सोशल मीडिया (Social Media) वरील पोस्टमुळे चर्चेत असते. जवळजवळ रोजच अमिषा सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते. नुकताच अमिषाने एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. (Photo Credit- @ameeshapatel9/Instagram)
अमिषाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या केसांशी खेळताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांची तिची चांगलीच मस्करी केली आहे. काही लोकांनी तिला आंटी म्हटलं आहे. तर काही जणांनी चक्क म्हातारी म्हटलं आहे. एका पठ्ठ्याने तर अशा व्हिडिओंमुळेच समाजात चुकीचा संदेश जातो असं म्हणायलाही कमी केलं नाही. काही चाहत्यांनी मात्र तिला पाठिंबा देत तिचं कौतुक केलं आहे.
अमिषा पटेल आता 44 वर्षांची झाली आहे. गेल्या अनेक वर्षात ती कोणत्याही सिनेमामध्ये काम करताना दिसली नाही. पण Big Boss च्या तेराव्या सिझनमध्ये जेव्हा तिला एन्ट्री मिळाली होती तेव्हा ती चर्चेत आली होती.
अमिषा पटेलची ट्रोल (Troll) होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधीही अमिषा अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. अमिषा ट्रोलर्सना सणसणीत उत्तरंदेखील देते.
अमिषाच्या करिअरची सुरुवात एकदम दणक्यात झाली होती. पण त्यानंतर तिला फारसं यश मिळालं नाही. अमिषा पटेल आता सिनेमांमध्ये दिसत नसली तरी मॉडेलिंग, फॅशनच्या दुनियेत चांगलीच स्थिरस्थावर झाली आहे. अमिषाने अनेकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न केला पण, तिचा हा प्रयत्न अपयशी ठरला.