या सगळ्याशिवाय प्रॉपर्टी प्रकरणातही अमीषा आणि तिच्या घरातल्यांमध्ये अनेक वाद झाले. अमिषाने वडिलांविरुद्ध १२ कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलचा जन्म मुंबईत ९ जून १९७६ मध्ये झाला. अमिषाने २००० मध्ये कहो ना प्यार है सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्या सिनेमातूनच तिला कमालीची लोकप्रिय झाली होती. हा सिनेमा हिट झाल्यानंतर २००१ मध्ये तिने गदर सिनेमातून साऱ्यांची मनं जिंकली होती.
सिनेमांत येण्यापूर्वी अमीषा आणि नेस वाडिया यांच्यात अफेअरच्या चर्चा होत्या. दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. नेसला अमिषासोबत लग्न करायचं होतं तर अमिषाला सिनेमात आपलं करिअर करायचं होतं. याच कारणामुळे दोघांचं ब्रेकअप झालं. यानंतर नेस प्रीति झिंटासोबत अनेक वर्ष नात्यात होता.
नेसशी वेगळं झाल्यानंतर अमीषाचं नाव दिग्दर्शक आणि निर्माते विक्रम भट्टशी जोडलं गेलं. अमीषाच्या घरातल्यांना विक्रमशी असलेलं नातं मान्य नव्हतं. अमिषाने एका पत्रकार परिषदेत तिच्या आईने तिला चपलेने मारत घराबाहेर काढल्याचं धक्कादायक विधान केलं होतं.
अमीषा आणि विक्रम यांचं नातं फार काळ टिकलं नाही. २००८ मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. या सगळ्याशिवाय प्रॉपर्टी प्रकरणातही अमीषा आणि तिच्या घरातल्यांमध्ये अनेक वाद झाले. अमिषाने वडिलांविरुद्ध १२ कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. वडील तिच्या पैशांचा गैरवापर करायचे असा तिचा आरोप होता.
अमीषा सध्या कोणत्याही सिनेमांत काम करत नसली तरी अनेक मोठ्या पार्ट्यांमध्ये ती आवर्जुन दिसते. अनेकदा तिला मद्यधुंद अवस्थेत पार्टीत फिरतानाही पाहण्यात येतं. टीव्ही अभिनेता कुशाल टंडन आणि तिचे असेच एका पार्टीत भांडण झाले होते. या भांडणामुळेही ती चर्चेत आली होती.