JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Birthday Special : लादेन सुद्धा होता अलका याग्निक यांचा फॅन, घरात सापडल्या होत्या गाण्यांच्या सीडी

Birthday Special : लादेन सुद्धा होता अलका याग्निक यांचा फॅन, घरात सापडल्या होत्या गाण्यांच्या सीडी

आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त गाणी गाणाऱ्या अलका यांनी वयाच्या 7 व्या वर्षीच गायला सुरुवात केली होती.

0107

80-90 च्या दशकातील प्रसिद्ध सिंगर अलका याग्निक यांचा आज वाढदिवस. आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त गाणी गाणाऱ्या अलका यांनी वयाच्या 7 व्या वर्षीच गायला सुरुवात केली होती.

जाहिरात
0207

अलका यांनी वयाच्या 7 व्या वर्षी रेडिओ कोलकातासाठी गायला सुरुवात केली. 90 च्या दशकात त्यांनी कुमार सानू यांच्यासोबत अनेक हिट गाणी दिली.

जाहिरात
0307

वयाच्या 10 व्या वर्षी अलका मुंबईत आल्या आणि वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी पायल की ‘झंकार’ या सिनेमासाठी गाणं गायलं. पण त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला ‘तेजाब’ सिनेमा. या सिनेमातील ‘एक दो तीन...’ हिट झालं आणि अलका यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

जाहिरात
0407

अल कायदाचा दहशतवादी आणि 9/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेन सुद्धा अलका यांचा चाहता होता. अमेरिकन एजन्सी CIA च्या माहितीनुसार त्याच्या पाकिस्तानातील एबोटाबादमधील घरात अलका, कुमार सानू आणि उदित नारायण यांच्या गाण्याच्या सीडी मिळाल्या होत्या.

जाहिरात
0507

अलका त्यांच्या कामाबद्दल खूपच काटेकोर आहेत. एकदा तर त्यांनी अभिनेता आमिर खानला सुद्धा आपल्या रेकॉर्डिंग स्टुडिओच्या बाहेर काढलं होतं. त्यावेळी ‘कयामत से कयामत तक’च्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं आणि आमिर त्यांच्या समोर बसला होता.

जाहिरात
0607

आमिर खान त्यांच्याकडे एकटक पाहत होता. ज्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होत होतं. या गोष्टीचा त्यांना राग आला आणि त्यांनी आमिरला स्टुडिओच्या बाहेर जायला सांगितलं. पण नंतर त्यांना समजलं की आमिर या सिनेमाचा हिरो आहे त्यावेळी त्यांनी त्याची माफी मागितली.

जाहिरात
0707

पर्सनल लाइफ बद्दल बोलायचं तर त्यांनी नीरज कपूर यांच्याशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे जिचं नाव सायशा आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या