JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अक्षय कुमार ठरला फोर्ब्सच्या यादीत एकमेव भारतीय सेलिब्रेटी, एवढी आहे वर्षभरातील कमाई

अक्षय कुमार ठरला फोर्ब्सच्या यादीत एकमेव भारतीय सेलिब्रेटी, एवढी आहे वर्षभरातील कमाई

मागच्या वर्षीप्रमाणं यंदाही अक्षयनं पहिल्या 100 श्रीमंत सेलिब्रेटींच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 जून : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये एका वर्षात सर्वाधिक सिनेमा करणारा अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्यावरून त्याच्या वर्षभराच्या कमाईची चर्चा सुद्धा होते. पण आता अक्षय पुन्हा चर्चेत आला आहे ते फोर्ब्स मासिकानं त्यांची जगभरातील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रेंटीची यादी जाहीर केल्यामुळे. मागच्या वर्षीप्रमाणं यंदाही अक्षयनं पहिल्या 100 श्रीमंत सेलिब्रेटींच्या यादीत स्थान मिळवलं आहे. फोर्ब्सनं नुकतीच जगभरातील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रेटींची यादी जाहीर केली. यात जून 2019 ते मे 2020 या काळातील जगातल्या पहिल्या 100 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात एकमेव भारतीय सेलिब्रेटी अक्षय कुमारचा समावेश आहे. या यादीत अक्षय कुमार USD 48.5 मिलियन म्हणजे भारतीय 366 कोटींच्या कमाईसह 52 व्या क्रमांकावर आहे. तर कायली जेनर USD 590 मिलियन म्हणजे भारतीय 4,453 कोटींसह पहिल्या क्रमांकावर आहे.

अक्षय कुमारचा मागच्या वर्षीही या यादीत समावेश होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत अक्षय जवळपास 19 अंकांनी मागे गेला आहे. मागच्या वर्षीची अक्षयची कमाई USD 65 मिलियन म्हणजे भारतीय 490 कोटी एवढी होती. मागच्या वर्षी अक्षय कुमार 33 व्या स्थानावर म्हणजे पहिल्या 50 श्रीमंत सेलिब्रेटींमध्ये होता. मात्र यंदा तो 52 व्या क्रमांकावर आहे. या यादीत टॉप 10 मध्ये कायली जेनर, कान्ये वेस्ट, रॉजर फेडरर, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, टायलर पेरी, नेमार, हॉवर्ड स्टर्न, लेबरॉन जेम्स, ड्वेन जॉन्सन यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याच्या सूर्यवंशी सिनेमाचं प्रदर्शन रखडलं आहे. याशिवाय लक्ष्मी बॉम्ब, बेल बॉटम या त्याच्या सिनेमाचं शूटिंग सुद्धा लाबंणीवर पडलं आहे. अक्षयचा सूर्यवंशी सिनेमा मार्चमध्ये रिलीज होणार होता मात्र कोरोना व्हायरसमुळे हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं असून या सिनेमात अक्षयसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या