JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / दुबईच्या रस्त्यावर ऐश्वर्या रॉयला भेटली पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान! त्यांनतर जे घडलं ....

दुबईच्या रस्त्यावर ऐश्वर्या रॉयला भेटली पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान! त्यांनतर जे घडलं ....

विश्वसुंदरी आणि बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनने(Aishwrya Roy Bachchan) नुकताच ‘पॅरिस फॅशन वीक २०२१’ मध्ये सहभाग घेतला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 ऑक्टोबर- विश्वसुंदरी आणि बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनने**(Aishwrya Roy Bachchan)** नुकताच ‘पॅरिस फॅशन वीक २०२१’ मध्ये सहभाग घेतला होता. यातील अभिनेत्रीच्या लूकने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. ऐश्वर्या रॉयचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होते. या दरम्यान ऐश्वर्या रॉय दुबईमध्ये (Dubai) पोहोचली होती. दुबईमध्ये तिची एका खास चाहतीशी भेट झाली आहे. ही चाहती इतर कोणी नसून पाकिस्तानची प्रसिद्ध (Pakistani Actress) अभिनेत्री सादिया खान (Sadia Khan) आहे. या दोघींचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संबंधित बातम्या

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनच्या विनम्रतेवर खूश होऊन पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. सादियाने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे, ‘पृथ्वीवरील सर्वात सुंदर स्त्रीशी माझी टक्कर झाली’. अभिनेत्री ऐश्वर्या रॉयची लोकप्रियता काही नव्याने सांगायला नको. ऐश्वर्या रॉय बच्चनचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. ही अभिनेत्री कोणत्याही देशात गेली तरी तिला तिथे तिचे चाहते भेटतातचं.असंच काहीसं दुबईमध्येही घडलं. सादिया खान आणि ऐश्वर्या रॉयचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा विषय ठरला आहे. (हे वाचा: अभिनेत्री यामी गौतमची ही हॅण्डबॅग चर्चेत; किंमत जाणून व्हाल थक्क ) पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला आणि ऐश्वर्या रॉय बच्चनचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, ‘आज पृथ्वीवरील सर्वात सुंदर आणि अत्यंत विनम्र अशा स्त्रीला मी धडकले. अर्थातच भेट झाली. अभिनेत्रीने पुढं लिहिलं आहे. मी एका क्षणासाठी माझी मान खाली घातली जेव्हा मला ऐश्वर्या रॉय यांनी म्हटलं देव सैदव तुझं चांगलं करो. तू खूपच सुंदर आहेस. आणि म्हणून आता मला माहितेय मी खरंच सुंदर आहे. असं लिहीत सादियाने लाजरे इमोजी शेअर केले आहेत. एका पाकिस्तानी अभिनेत्रीकडून ऐश्वर्या रॉयचं इतकं कौतुक ऐकून चाहते प्रचंड खुश झाले आहेत. आणि आपल्या लाडक्या अभिनेत्रीवर अभिमान करत आहेत. नुकताच लॉरियल पॅरिस वीकमध्ये अनेक कलाकारांनी रॅम्प वाक केला होता. यामध्ये ऐश्वर्या रॉय बच्चनचासुद्धा समावेश होता. कामाबद्दल सांगायचं झालं तर ऐश्वर्या रॉय मणिरत्नम यांच्या मैग्नम ओपस पोन्नियिन सेलवन: पार्ट वनमधून पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या